अर्जुन कपूरच्या फोटोवर मलायकाने घेतली फिरकी, नेटकऱ्यांना आवरेना हसू!

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सोशल मीडियीवर एकमेकांची मजा घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. असंच काहीसं यावेळी झाल्याचं दिसून आलं... 

मुंबई : कोणत्या ना कोणत्या कारणाने बॉलिवूड नेहमीच चर्चेत असतं. त्यात चाहत्यांचं आकर्षण असलेला विषय म्हणजे बॉलिवूडचे कपल. असंच बॉलिवूडमधलं बहुचर्चित कपल म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अंकाउंटवर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. पण, या  फोटोच्या कॅप्शनची सध्या इंटरनेटवर खूप चर्चा आहे. जाणून घ्या काय आहे कॅप्शन...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mirror mirror (not)on the wall !!! #aboutlastnight #lakmefashionweek2019 #vanitywalapic

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सोशल मीडियीवर एकमेकांची मजा घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. असंच काहीसं यावेळी झाल्याचं दिसून आलं. अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकत्याच पार पडलेल्या Lakme Fashion Week 2019 च्या बिहाईंड दि सीनमधील एक फोटो अपलोड केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन मात्र त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिने त्याला चांगलचं ट्रोल केलं आहे. हातामधील आरशात पाहताना टिपलेल्या त्याच्या फोटोला अर्जुनने, "मिरर मिरर (नॉट) ऑन दि वॉल" अशा प्रकारचं कॅप्शन दिलं आहे. यावर आपली प्रतिक्रिया मांडताना मलायकाने कमेंटमध्ये लिहिलं की, “वा, काय विनोद आहे !”. 

Arjun Kapoor

Lakme Fashion Week च्या चौथ्या आठवड्यात अर्जुन कपूरने त्याचा खास मित्र आणि डिझायनर कुणाल रावलसाठी रॅम्पवॉक  केला. याचं वैशिष्ट्य म्हणजे अर्जुनने हा रॅम्पवॉक चुलत भाऊ म्हणजे जहान कपूर सोबत केला. जहान कपूर हा अभिनेता संजय कपूर आणि माहिप कपूर यांचा मुलगा आहे.

अर्जुन कपूर त्याच्या हटके अंदाजात करड्या रंगाचं जॅकेट आणि तपकिरी रंगाची पॅंट अशा वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये दिसला. तर, मलायकासुद्धा याच Fashion Week मध्ये डिझायनर दिव्या आणि राजवीर यांच्या खास वेषभूशेत रॅम्पवॉक  करताना दिसली. मलायका आणि अर्जुन यांनी त्यांच्या नात्याला न लपवता आता सर्वांसमोर आणलं आहे आणि ते अनेकदा मीडियासमोर एकत्रही आले आहेत. अर्जुनच्या 34व्या वाढदिवसानिमित्त मलायकाने त्या दोघांचा रोमॅंटिक फोटो अपलोड केला आणि नातं ऑफिशीयली मान्य केलं. त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सर्वत्र चालू आहेत. मात्र याविषयी कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण त्या दोघांनी अद्याप दिलेलं नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malaika Arora hilariously trolls Arjun Kapoor for candid photo on Instagram