आयटम सॉंगलाच मलायकाचे प्राधान्य 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

"छय्या छय्या', "मुन्नी बदनाम हुई' या आयटम सॉंगवर थिरकून रसिकांना घायाळ करीत अभिनेत्री मलायका अरोराने खूप लोकप्रियता कमावली. तिलादेखील आयटम सॉंग करायला आवडते. ती म्हणते, की मी सिनेमात जास्त मोठा रोल व मुख्य भूमिका करू शकत नाही. आयटम सॉंग व केमिओ करून मी खूप खूश आहे. मलायका 15 वर्षांच्या मुलाची आई असून कौटुंबिक जबाबदारीमुळे ती रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्याचे बोलले जाते; मात्र हे म्हणणे ती खोडून काढते. मलायकाने सांगितले, की असे अजिबात नाहीय. मला कधीच रुपेरी पडद्याची ओढ नव्हती. मला रुपेरी पडद्यावर फक्त आयटम सॉंग आणि केमिओ करायलाच आवडते. मला पूर्ण चित्रपट करायला आवडत नाही. 

Web Title: malaika arora khan item songs priory