लग्नाचं नंतर बघु आता तर अर्जूनसोबत प्री-हनिमून फेजचा आनंद घेतेय Malaika Arora | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

malaika arora,arjun kapoor

लग्नाचं नंतर बघु आता तर अर्जूनसोबत प्री-हनिमून फेजचा आनंद घेतेय Malaika Arora

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतेच. मलायका आणि अरबाजचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या टिका करण्यात आली. आताही तिला अनेक कारणांनी ट्रोल करण्यात येत. मात्र या घटस्फोटांनतर दोघेही त्याच्या आयूष्यात पुढे गेले आहे. मलायका अर्जून कपुरला डेट करत आहेत तर अरबाज जॉर्जियाला डेट करत आहे.

दोघेही वेगळे झाले असले तरी घटस्फोटानंतरही हे जोडपं त्यांचा मुलगा अरहानच्या निमित्तानं एकमेकांना भेटतात आणि पार्टीतही हजर राहतात.

मलायका आणि अर्जूनने काही दिवसांपुर्वीच त्यांच नातं सार्वजनिक केलं आणि ते आता सोबत वेळ घालवत आहे.

मलाइकाला अर्जुनबद्दल विचारण्यात आले की तिच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तिला ती डेट करण्याचा अनुभव कसा आहे. यावर प्रतिक्रिया देताना मलायका म्हणाली, मला वाटतं की हे आश्चर्यकारक आहे. जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा मला सांगण्यात आले की हा टॅग नेहमी तिच्यासोबत असेल.

घटस्फोटानंतर दुसरं प्रेम शोधणं ही खुप वेगळी बाब आहे. मग त्यात एका तरुण माणसामध्ये प्रेम शोधताना, मला स्पष्टपणे सांगण्यात आले की मी तिनं तिचा ओळख गमावली आहे.

अर्जुनने आपलं आयुष्य प्रेमाने भरले आहे, असं तिनं सांगितले. त्याने तिच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहे. दोघांमध्ये वयाचा फरक असला तरी दोघेही एकत्र राहण्याचा आनंद घेतात.

रिलेशनशिपमध्ये असूनही तुम्ही आनंदी नसाल तर काही उपयोग नाही, असं मलायका म्हणते. याशिवाय, जेव्हा तिला अभिनेत्याशी लग्न करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की ती सध्या रिलेशनशिपचा टप्पा एन्जॉय करत आहे. लग्नाबाबत ती सध्या काहीच बोलू शकत नाही. सध्या ते प्री-हनिमून पीरियडवर आहेत.