अर्जून कपूर सोबत लग्नाच्या चर्चांवर मलायकाचे 'हे' उत्तर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

अलिकडच्या काळात बऱ्याच पार्टी, फॅशन शोज्, कार्यक्रमांना 'हे' दोघे सोबत आले आहेत. आता तर 'या' दोघांच्या लग्नाची तारिख ठरल्याचेही म्हटले जात आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर यांच्या अफेयरची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. या चर्चेला सुरवात झाली तेव्हा मलायका आणि अर्जून या दोघांनीही अफेयरबाबत नकार दिला, मात्र अलिकडच्या काळात बऱ्याच पार्टी, फॅशन शोज्, कार्यक्रमांना हे दोघे सोबत आले आहेत. आता तर या दोघांच्या लग्नाची तारिख ठरल्याचेही म्हटले जात आहे.

19 एप्रिलला मलायका आणि अर्जून लग्नगाठ बांधणार असल्याचे कळते. हे लग्नं ख्रिश्चन पध्दतीने होणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र लग्नाच्या तारखेविषयी 'बॉम्बे टाइम्स'ने मलायकाला विचारले असता ती म्हणाली की, 'हे वृत्त खरे नाही.' तसेच अर्जूनचे वडिल बोनी कपूर यांनीही हे वृत्त खरे नसल्याचे सांगितले होते. 

मलायका-अर्जून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये रंगली आहे. पण दोघांनीही आतापर्यंत आपल्या नात्याबद्दल जाहीर बोलणे टाळले आहे. मलायका अरोरा हिचे लग्न अभिनेता अरबाज खान सोबत झाले होते. लग्नाच्या 18 वर्षानंतर 2017 ला या दोघांमध्ये घटस्फोट झाला. त्यांना अरहान हा 16 वर्षाचा मुलगा आहे. अरबाज सध्या जॉर्जिया अँड्रियानी ला डेट करत आहे.

malaika_arjun

malaika_arjun


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malaika Arora replys on her wedding with Arjun Kapoor on 19 April