अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबाबत मलाईका अरोराचा खुलासा, म्हणाली मला पुन्हा बनायचंय आई..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

मलाईकाला वयाच्या ५६ व्या वर्षात पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा आहे आणि ते ही अर्जुनसोबत बेबी प्लानिंग करुनंच.

मुंबई- बॉलीवूडमध्ये घटस्फोट होऊन दुसरा संसार थाटणं काही नवीन नाही. आत्तापर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी लग्नाच्या अनेक वर्षांनंतर घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं आहे आणि त्यात ते सुखात आहे. मात्र बॉलीवूडमध्ये सध्या असंच एक हॉट कपल त्यांच्या लग्नाच्या बातम्यामुळे चर्चेत असतं आणि ते म्हणजे अर्जुन कपूर आणि मलाईका अरोरा. मलाईकाने अरबाज खानसोबत लग्नाच्या जवळपास १९ वर्षांनंतर घटस्फोट घेतला आणि आता ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत अफेअरमध्ये आहे. नुकतंच मलाईकाला अर्जुनसोबतच्या लग्नाबाबत विचारलं असता तिने त्याच्यासोबत लग्न करणार असल्याचं तसंच बेबी प्लान करणार असल्याचंही सांगितलं. 

हे ही वाचा: शाहरुख खानसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची संधी, फक्त करा एवढंच...

मलाईका अरोरा हिने नुकत्याच एका मुलाखतीत अर्जुनसोबत लग्न करण्याबातच्या प्रश्नावर उत्तर दिलं. मलाईका म्हणाली ती अर्जुनसोबत बेबी प्लान नक्की करणार आहे मात्र तिने त्याच्यासोबत लग्न कधी करणार याबाबत खुलासा केला नाही. मलाईका आणि अर्जुन यांच्यात १० वर्षाच अंतर आहे. अरबाजसोबत लग्न केल्यानंतर मलाईका एका मुलाची आई होती. आता पुन्हा एकदा तिला वयाच्या ५६ व्या वर्षात पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा आहे आणि ते ही अर्जुनसोबत बेबी प्लानिंग करुनंच.

Arjun, Malaika click love-filled images of each other

या मुलाखतीत मलाईका म्हणाली आम्ही आमच्या नात्यात एकावेळी एकंच पाऊल टाकत आहोत. लग्नाबाबत आत्ता काही सांगू शकत नाही पण येत्या काही काळात जर आम्ही दोघांनी मिळून कोणता निर्णय घेतला तर याबाबत नक्कीच सगळ्यांना कल्पना देऊ.

Arjun Kapoor & Girlfriend Malaika Arora OPENLY Show Their ...

याउलट अर्जुन कपूरने एका मुलाखतीत लग्नाबाबत उत्तर देताना म्हटले होते की, मी माझ्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात खुप सुखी आहे. मी गुपचुप लग्न करुन चाहत्यांना त्रास देणार नाही. जेव्हा लग्न करायचे असेल त्यावेळी मी सगळ्यांना सांगेन. एकीकडे मलाईका आणि अर्जुन कपूर यांचं अफेअर सुरु आहे तर दुसरीकडे अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया अंड्रियानी यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

Arbaaz Khan Confirms Dating Giorgia Amidst Arjun Kapoor-Malaika ...

मलाईका आणि अर्जुन यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली सगळ्यांसमोर दिलेली नसली तरी अनेकदा त्यांच्या सोशल मिडियावरील अपडेट्स वरुन दोघांमध्ये सुरु असलेलं अफेअर जगासमोर आलं आहे. तेव्हा आता हे दोघं लग्नबंधनात कधी अडकतायेत याचीच त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.   

malaika arora wants be mother again reveals about her marriage arjun kapoor  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malaika arora wants be mother again reveals about her marriage arjun kapoor