मलायकाला अर्जुनसोबत 'या' ठिकाणी करायचं आहे लग्न, सांगितला वेडिंग प्लान !

Malaika told about her wedding plan
Malaika told about her wedding plan

मुंबई : बॉलिवूडमध्ये लव- अफेअर च्या चर्चा सामान्य आहेत. त्यामुळे बी- टाऊनमधील कपल्स कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेमध्ये असतात. अनुष्का-विराट, दीपिका- रणवीर, आलिया-रणबीर आणि सध्या इंटरनेटवर कपल गोल्स देणारे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर या जोड्या चाहत्यांच्या आवडीच्या आहेत. बऱ्याच काळानंतर या दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आणि आता ते पब्लीक अपिअरन्समध्ये अनेकदा झळकतात. प्रसारमाध्यमांसमोर या कपलने प्रेमाचं नात अधिरकृतपणे मान्य केलं आहे. अनेकदा ते परदेशी फिरायला जातात तर कधी एकमेकांच्या नातेवाईकांसोबत वेळही घालवतात. गेल्या काही काळापासून बी-टाउनमध्ये चर्चा आहे ती अर्जुन आणि मलायका यांच्या लग्नाची. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank u @neetu54 n Rishi uncle for such a warm n lovely evening #Nyc

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

लग्नाच्या चर्चांना उधाण आले असतानाच आता मलायकाने तिच्या 'ड्रीम वेडिंग प्लान' विषयी सांगिलतं आहे. अभिनेत्री नेहा धुपियाच्या #नो फिल्टर नेहा' या चॅट शोच्या एका एपिसोडमध्ये मलायका पोहोचली होती. चॅटदरम्यान मलायकाने अर्जुनसोबतच्या ड्रीम वेडिंगविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. त्यावेळी तिने बिचवर लग्न करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

मलायका म्हणाली,' मला बीचवर लग्न करायचं आहे. लग्नाची थीम पूर्मपणे पांढऱ्या रंगाची असेल. त्यामुळे सर्वच गोष्टी पांढऱ्या रंगाच्या असतील. तर, माझी गर्लगॅंगची टीम माझ्या 'ब्राइचमेड्स' असतील. लग्नामध्ये मला Elie Saab gown गाऊन परिधान करायचा आहे. '

त्यावेळी ती अर्जुनविषयी बोलताना म्हणाली, ' अर्जुनला असं वाटतं की मी त्याचे चांगले फोटो काढत नाही. असं असलं तरी तो एक चांगला फोटोग्राफर आहे आणि माझे छान फोटो तो काढत असतो.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy bday my crazy,insanely funny n amazing @arjunkapoor ... love n happiness always

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायका अरोरा आणि अरबाज खान हे 17 वर्षे एकत्र होते. त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. त्यानंतरच मलायका आणि अर्जुन एकत्र आले आणि डेट करायला लागले. मलायका आणि अरबाजच्या मुलाचं नाव अरहान आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनने त्यांच्या दोघांचा रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता. अर्जुनचा 'पानिपत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अर्जुनच्या सदाशिव राव भाऊंच्या लुकला चाहत्यांनी पसंती दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com