
Mallika Sherawat : दंगलमध्ये आमिरची बायको होणार होती मल्लिका, पण मंगल पांडे म्हणाला, 'अरे हिला...'
Mallika Sherawat actress Dangal Movie Audition Aamir Khan Rejects : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा दंगल हा प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडीच्या चित्रपटांपैकी एक. आमिर खाननं त्यामध्ये महावीर फोगाट यांची साकारलेली भूमिका अनेकांच्या मनात घर करुन आहे. केवळ भारतच नाही तर चीनमध्ये देखील हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता.
आमिरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणजे दंगल. या चित्रपटानं आमिरला मोठी कमाई करुन दिली होती. त्यानंतर आमिरच्या नावाभोवतीचं कुतूहल आणखी वाढीस लागलं. त्याला चाहत्यांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या एका बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वास्तविक दंगल चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये बॉलीवूडचे दिग्गज कलाकार सहभागी झाले होते.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
दंगलची ऑडिशन द्यायला बॉलीवूडची सौंदर्यवती मल्लिका शेरावत देखील गेली होती. ती त्यामध्ये पासही झाली. पण आमीर खाननं तिच्या नावाला नापसंती दर्शवली होती. मलायकानं तिच्या एका मुलाखतीमध्ये याविषयी सांगितले आहे. आपणही दंगल या चित्रपटाचा भाग झालो असतो पण ती संधी माझ्याकडून हुकली. असे तिचे म्हणणे होते. मल्लिका ही दंगलमध्ये महावीर फोगाट (जी भूमिका आमिर खाननं) यांच्या पत्नीची भूमिका साकारणार होती.
दंगलच्या मेकर्सला मल्लिकाची ऑडिशन आवडलीही होती. पण आमिर खानला ती आवडली नाही. त्यानं तिला चित्रपटात घेण्यास नकार दिला. त्याचे म्हणणे होती की, मल्लिका ही चार मुलांची आई वाटतच नाही. त्यामुळे तिला त्या भूमिकेमध्ये घेऊन काहीही उपयोग होणार नाही. पुढे ती भूमिका साक्षी तंवरनं साकारली होती.
मर्डरनंतर मल्लिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तिच्या नावाला मोठं ग्लॅमर मिळालं होतं. या चित्रपटानं मल्लिकाला स्टार बनवलं होतं. त्यानंतर मल्लिकानं वेगवेगळे चित्रपट केले. पण तिनं तिची बोल्ड अँड हॉट इमेज कायम ठेवत चाहत्यांची अमाप लोकप्रियता मिळवल्याचे दिसून आले.