Hrithik Roshan: दृश्यम चित्रपटातील या अभिनेत्रीचा हृतिक रोशनवर होता क्रश, लग्नाची बातमी ऐकून तुटले होते ह्रदय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hrithik roshan

Hrithik Roshan: दृश्यम चित्रपटातील या अभिनेत्रीचा हृतिक रोशनवर होता क्रश, लग्नाची बातमी ऐकून तुटले होते ह्रदय

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन जितका चित्रपटांमध्ये त्याच्या अॅक्शनसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या देखण्या लुकसाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे लाखो महिला चाहते आहेत. आणि आता अलीकडेच एका अभिनेत्रीने खुलासा केला आहे की हृतिक तिचा क्रश होता.

ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीना आहे, जिने तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2013 मध्ये रिलीज झालेल्या मोहनलालच्या क्राइम थ्रिलर दृश्यममध्येही ती दिसली होती. या चित्रपटात तिने मोहनलाल यांच्या पत्नी राणीची भूमिका साकारली होती.

तिच्या या खुलाशानंतर मीना प्रसिद्धीच्या झोतात आली असून हृतिक रोशनचे नावही चर्चेत आहे. मीनाने 2009 मध्ये अभिनेता विद्यासागरसोबत लग्न केले होते. मात्र, गेल्या वर्षी जूनमध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी पतीचे निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, ते फुफ्फुसांशी संबंधित आजाराने त्रस्त होते.

मात्र, हृतिक रोशनबद्दल बोलायचे झाले तर, 2009 मध्ये त्याने सुझान खानशी लग्न केले. मात्र, लग्नाच्या 14 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. दोघांनाही दोन मुले आहेत. त्याचबरोबर हृतिक अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच बोलले नसले तरी दोघेही अनेकदा डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत असतात. त्याचबरोबर दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.