Man Jhala Bajind: मन झालं बाजिंद मालिकेतील अभिनेत्रीच्या पतीचे दु:खद निधन, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man Jhala Bajind, Man Jhala Bajind news, kalpana sarang, ramesh sarang

Man Jhala Bajind: मन झालं बाजिंद मालिकेतील अभिनेत्रीच्या पतीचे दु:खद निधन, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

Man Jhala Bajind Actress Kalpana Sarang Husband Passed Away news: झी मराठीवर अनेक लोकप्रिय मालिका गाजल्या. मग ती माझी तुझी रेशीमगाठ मालिका असो किंवा सध्या सुरु असलेली तू चाल पुढं.

याच झी मराठीवरील अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे मन झालं बाजींद.

मन झालं बाजींद मालिकेत फुई आजीची भूमिका लोकप्रिय झाली. ज्येष्ठ अभिनेत्री कल्पना सारंग यांनी ही भूमिका साकारली. कल्पना सारंग यांचे पती रमेश सारंग यांचं दुःखद निधन झालंय.

कल्पना यांनी सोशल मीडियावर पती रमेश सारंग यांचा फोटो पोस्ट केलाय. रमेश जयराम सारंग.. भावपूर्ण श्रद्धांजली.. 13 जून 1946- 12 मे 2023 अशी पोस्ट करून कल्पना यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मन झालं बाजींद मधील कल्पना यांचे सहकलाकार वैभव चव्हाण, श्वेता खरात अशा अनेक कलाकारांनी कमेंट करून कल्पना त्यांचं सांत्वन केलंय.

कल्पना सध्या शेतकरीच नवरा हवा या मालिकेत अभिनय करतोय. कल्पना या शेतकरीच नवरा हवा मालिकेत पारू अक्काची भूमिका साकारत आहेत. कल्पना साकारत असलेली पारू अक्काची भूमिका सध्या प्रचंड लोकप्रिय आहे.

इतकंच नव्हे तर कलर्स मराठी अवॉर्ड्समध्ये लोकप्रिय आजी म्हणून कल्पना सारंग यांना पुरस्कार मिळाला आहे. मालिकेतले कलाकार कल्पना यांच्या दुःखात सहभागी आहेत.

टॅग्स :Marathi Serial