मानसीला सुनावताना नवऱ्यानं ओलांडली मर्यादा..अश्लील हावभाव करत पोस्ट केला व्हिडीओManasi Naik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manasi Naik and husband pradeep Kharera arguments, reel, divorce

Manasi Naik: मानसीला सुनावताना नवऱ्यानं ओलांडली मर्यादा..अश्लील हावभाव करत पोस्ट केला व्हिडीओ

Manasi Naik: सध्या मानसी नाईक चर्चेत आहे ते तिच्या घटस्फोटामुळे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मानसीनं याआधी प्रदीपवर आरोप करत त्याला 'गोल्ड डिगर' म्हणूनही ईसकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीत संबोधलं होतं. प्रदीपनं फक्त पैशासाठी लग्न केलं,माझ्या जीवावरच तो लग्नानंतर जगत होता,काम करत नव्हता...असे एक ना अनेक आरोप मानसीनं केले आहेत. यावर प्रदीपनं थेट पलटवार केला नसला तरी तो देखील सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून मानसीला सुनावण्याची एकही संधी सोडत नाही. दोघांमध्ये सध्या सोशल मीडिया वॉर सुरू आहे,(Manasi Naik and husband pradeep Kharera arguments, reel, divorce)

हेही वाचा: Neha Pendse: नेहा पेंडसे भारतात कोरोना घेऊन येणार?

यादरम्यान प्रदीपनं मर्यादा ओलांडत अश्लील हावभाव करत व्हिडीओ पोस्ट केला आहे,ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आणि आता मानसीचे चाहतेच नाहीत तर सर्वसामान्य नेटकरी देखील त्याला टार्गेट करत आहेत.

काही दिवसांपूर्वी मानसीनं एका पोस्टच्या माध्यमातून प्रदीप सध्या दोन-दोन मुलींना डेट करतोय असा आरोप केला होता. त्या तिच्या पोस्टवरनं खळबळ उडाली होती. आता प्रदीपनं देखील याला पलटवार करत एक रील पोस्ट केली आहे,ज्यात त्यानं 'माझं आयुष्य,माझे लोचे...'इतर कुणी यावर बोलू नये असं थेट म्हटलंय. आणि हे बोलताना त्यानं ज्या पद्धतीनं हावभाव केलेयत ते फारच अश्लील आहेत असा आरोप नेटकरी करु लागलेयत. अनेकांनी तर मानसीनं अशा माणसावर प्रेम कसं केलं असा थेट सवाल केला आहे.