Ponniyin Selvan 2 : प्रतिक्षा संपली! 'पोन्नियिन सेल्वन 2' च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर

मणिरत्नमचा 'पोन्नियिन सेल्वन 2' हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.
ponniyin selvan 2
ponniyin selvan 2Sakal

दिग्दर्शक मणिरत्नम यांचा प्रसिद्ध चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन'च्या यशानंतर आता चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पोन्नियिन सेल्वन 2' सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट यावर्षी 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

त्याचबरोबर या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही समोर आली आहे. निर्मात्यांनी 'पोन्नियिन सेल्वन 2' च्या जबरदस्त पोस्टरसह चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये मुख्य कलाकार चियान विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन दिसत आहेत. चित्रपटाचे पोस्टर खूपच प्रेक्षणीय आहे. ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेबद्दल बोलायचे झाले तर, प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

'पोन्नियिन सेल्वन 2' चा ट्रेलर 29 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे, याचा अर्थ फक्त काही दिवसांची प्रतीक्षा आहे. अलीकडेच, चियान विक्रमचा फर्स्ट लूक या चित्रपटातून समोर आला होता ज्यामध्ये तो योद्धाच्या भूमिकेत दिसला होता.

ponniyin selvan 2
Dhanush: रजनीकांतचा जावई धनुषच्या दुसऱ्या लग्नाचे वारे लागले वाहू?

चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम रवी आणि त्रिशा कृष्णन यांसारखे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांच्या यादीत 'पोन्नियिन सेल्वन 2' चे नाव देखील समाविष्ट आहे. चाहतेही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'पोन्नियिन सेल्वन' 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली, तर जगभरातील चित्रपटाने 450 कोटींहून अधिक कमाई केली. आता सर्वांच्या नजरा 'पोपोन्नियिन सेल्वन 2'वर खिळल्या आहेत, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचे किती लक्ष वेधून घेतो हे पाहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com