'मणिकर्णिका' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

मुंबई - कंगना राणौत हिची प्रमुख भूमिका असलेल्या "मणिकर्णिका' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी संबंधित चुकीच्या तारखा दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. या याचिकेवर चित्रपटाच्या निर्मात्यांनी दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी देत चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुभा दिली.

"मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झाशी' या चित्रपटात इतिहासातील घटनांचा विपर्यास केला आहे, अशा आरोपाची याचिका राणी लक्ष्मीबाई यांच्या पाचव्या पिढीतील वंशज वकील विवेक तांबे यांनी उच्च न्यायालयात केली होती. राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाशी निगडित सरकार दप्तरी असलेले दाखले, शालेय पुस्तकांतील तारखा असे पुरावे असतानाही चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही पुस्तकांतील संदर्भांचाच आधार घेतल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला होता. राणी लक्ष्मीबाई यांची जन्मतारीख, लग्नाच्या वेळी असलेले वय, ब्रिटिशांविरुद्ध लढाई आदी सर्वच तारखांमध्ये गोंधळ असल्याचा दावा त्यांनी केला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manikarnika Movie Release entertainment