मणिकर्णिका कंगनाचा रुद्रावतार; पोस्टर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नुकताच सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. सिनेमात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई या मुख्य पात्राच्या भूमिकेत आहे. 

मुंबई : कंगना राणावत अभिनीत 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी' या सिनेमाची चर्चा अधूनमधून सुरुच असते. नुकताच सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. सिनेमात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई या मुख्य पात्राच्या भूमिकेत आहे. 

पोस्टरमध्ये दाखविल्याप्रमाणे, कंगना युध्द मैदानावर घोडेस्वारी करते आहे. आपल्या मुलीला पाठीवर बांधत ती शत्रूंशी लढत आहे. अतिशय आक्रमक हावभावात ती दिसत आहे. 
 

'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी' 26 जानेवारी 2019 ला रिलीज होणार आहे. सिनेमा दिग्दर्शन राधा क्रिष्ण जगरलामुदी करत आहे. कंगना शिवाय सिनेमात सोनू सुद, अंकिता लोखंडे, डॅनी डेंझोगपा, वैभव तत्ववादी, अतुल कुलकर्णी, सुरेश ओबेरॉय, अमित बेहल अशा तगड्या कलाकारांच्या भूमिका असणार आहे. 
 

 

काही दिवसांपूर्वी सिनेमातील कंगणाच्या लूकचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंनाही प्रेक्षकांनी सोशल मिडीयावर पसंती दिली.   

Manikarnika


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manikarnika The Queen Of Jhansi Poster Release