मूव्ही मस्ती विथ मनीष पॉल ; मनीष पॉल घेऊन येतोय नवा अतरंगी शो !

Manish Paul Roped In To Host A Bollywood Based Game Show
Manish Paul Roped In To Host A Bollywood Based Game Show

मुंबई : तुम्ही स्वत:ला चित्रपटप्रेमी समजता ना? तुमचे आवडते कलाकार चालले त्या भूमीला वंदन करता ना? त्यांच्या अगदी नावडत्या चित्रपटाचेही बारीकसारीक तपशील तुम्हाला ठाऊक असतात ना? मग आता तुमच्या चित्रपटांच्या या आवडीचा उपयोग करून थोडीशी धमालमस्ती करण्याची संधी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. झी टीव्ही आता लवकरच चित्रपटांवर आधारित पहिलाच ‘मूव्ही मस्ती विथ मनीष पॉल’ नावाचा एक हलकाफुलका गेम शो सादर करणार आहे.

मिश्कील सूत्रसंचालक मनीष पॉल हा सूत्रधार असलेल्या या कार्यक्रमात त्याचे बॉलिवूडच्या चित्रपटांचे वेड असलेले कुटुंबीय एक धमाल कार्यक्रम सादर करतील. त्यात बॉलिवूडच्या विख्यात कलाकारांना बॉलिवूडशी संबंधित विविध प्रश्न विचारून तसेच काही मजेशीर खेळ खेळायला लावून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आजवर अज्ञात असलेली बाजू पुढे आणली जाईल.

‘मूव्ही मस्ती विथ मनीष पॉल’ या कार्यक्रमात दर आठवड्यास चार महत्त्वाचे बॉलिवूड कलाकार एका सामान्य माणसाला आपला जोडीदार म्हणून घेऊन येतील. त्यांना या कार्यक्रमात विविध कामे करायला दिली जातील आणि त्याचसोबत रॅपिड फायर प्रश्नोत्तरे केली जातील. पण हे करताना मनीष पॉलचे बॉलिवूडने पछाडलेले कुटुंबीय या कलाकाराच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. 

या कार्यक्रमातील मनीष पॉलच्या कुटुंबातील सर्वच सदस्य हे नेहमीच्या मसालेदार बॉलिवूड चित्रपटातील व्यक्तिरेखांसारखे ठोकळेबाज असतील. उदाहरणार्थ, मनीषची आई ही हिंदी चित्रपटांतील ठरावीक साच्यातील 'माँ' असेल. तर 'पिता' हे नेहमीच ज्यात त्यात मोडता घालणारे खलनायक असतील. ते वयस्कर दिसत असले, तरी स्वत:ला 'अजून यौवनात मी' असेच समजत असतात. याशिवाय एक सर्व काही सेट करणारा, एक मॅनेजर आणि एक खट्याळ, आकर्षक अशी ‘भाभी’ही असेल.

या कार्यक्रमाविषयी बोलताना मनीष पॉल म्हणाला, " झी टीव्हीशी माझा संबंध तसा खूप जुना आहे. मी पूर्वी 'डीआयडी लिटिल मास्टर्स', 'सा रे ग म पा ' आणि अशा अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. झी टीव्हीशी असलेला माझा संबंध अतिशय आनंददायक राहिला असून त्यांनी जेव्हा मला या कार्यक्रमासाठी विचारणा केली, तेव्हा मी त्याला नाही म्हणू शकलो नाही. हा कार्यक्रम म्हणजे बॉलिवूडच्या प्रत्येक घटकाचा सन्मान असून एक देश म्हणून आपल्याला असलेल्या बॉलिवूडच्या तीव्र आकर्षणाचे दर्शन यातून घडेल. या कार्यक्रमाची संकल्पना आणि रूपरेषा त्याच्या निर्मात्यांनी सांगितल्यापासूनच मी मनाने या कार्यक्रमाशी जोडला गेलो. माझ्यासारख्या बॉलिवूडच्या एका कट्टर चाहत्यासाठी ही एक मेजवानीच ठरेल. आता या कार्यक्रमाचं केवळ सूत्रसंचलनच मी करणार आहे, असं नव्हे; तर मला बॉलिवूडच्या सर्वात हॉट कलाकारांनाही हिंदी चित्रपट आणि या उद्योगाची किती माहिती आहे, ते तपासता येणार आहे. आपल्या आवडत्या ताऱ्यांना कोंडीत पकडलेलं पाहताना प्रेक्षकांनाही मजा येईल, तसंच त्यातील काही चाहत्यांना या ताऱ्यांसोबत या कार्यक्रमात सहभागी होता येईल. हा एक संपूर्णपणे कौटुंबिक मनोरंजनाचा कार्यक्रम असून तो सर्व कुटुंबियांना हसवत ठेवील.”

या कार्यक्रमात आपल्या प्रतिस्पर्धी कलाकाराशी स्पर्धा करणे ही सोपी गोष्ट नसेल. कारण मनीष आणि त्याचे फिल्मी कुटुंबीय या कलाकरांचे बॉलिवूडविषयी असलेले ज्ञान तपासणार आहेत आणि त्यात जेव्हा ते कमी पडतील, तेव्हा ते त्यांची खरडपट्टीही काढणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग म्हणजे चित्रपट, विनोद आणि त्यातील फिल्मी कुटुंबीय यांच्या विक्षिप्तपणाचा अतिरेकी डोस असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com