मनीषाचं कम बॅक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

अभिनेत्री मनीषा कोईराला लवकरच बॉलीवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत पुनरागमन करणार आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित संजय दत्तच्या बायोपिकमध्ये ती नरगीस दत्तची भूमिका साकारणार आहे. मनीषा बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर कम बॅक करतेय. याविषयी हिराणी म्हणाले की, नरगीस दत्तच्या भूमिकेसाठी बऱ्याच अभिनेत्रींचा विचार करण्यात आला. मनीषा खूप चांगली अभिनेत्री आहे आणि योगायोग म्हणजे कर्करोग या आजाराचा मनीषाने जिद्दीने सामना केला आणि नर्गीस दत्त यांनाही कर्करोग झाला होता. म्हणूनच कदाचित तिची निवड झालीय का? अशीही दाट शक्‍यता आहेच. ते काहीही असो; पण मनीषाची वापसी हीच आनंदाची गोष्ट आहे. 

चित्रपटाच्या चित्रीकरणाला जानेवारीपासून सुरुवात झालीय. या वर्षीच हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जातंय.  
 
Web Title: Manisha koirala come back