अभिनेत्री अश्विनी भावे यांचा मांजा प्रदर्शनाच्या वाटेवर

टीम इ सकाळ
सोमवार, 19 जून 2017

मांजा या आगामी सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचे नुकतेच काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. या पोस्टर सिरीजमध्ये एकूण ६ पोस्टर्स असून त्यामध्ये दोन पिढ्या दिसतात.

मुंबई : मांजा या आगामी सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचे नुकतेच काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. या पोस्टर सिरीजमध्ये एकूण ६ पोस्टर्स असून त्यामध्ये दोन पिढ्या दिसतात.

पालकाच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे तर आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व रोहित फाळके आणि सुमेध मुद्गलकर करत आहेत. एका आईची चिंता आणि आजची पिढी व त्यांची संगत या बद्दलच एकूण चित्र या पोस्टर्स मध्ये दिसून येत, तसेच यामध्ये पालकांना पडलेले प्रश्न आणि आजकालच्या मुलांच्या वृत्ती यांची सांगड घातलेली आहे.

जतीन वागळे दिग्दर्शित मांजा हा चित्रपट २१ जुलैला जागतिक पातळीवर प्रदर्शित होणार आहेत. त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तसेच नितीन केणी आणि मनीष वसिष्ट यांच्या MFDC कंपनीने हा सिनेमा प्रस्तुत केला आहे. 
 

Web Title: Manja new posters esakal news