नेमबाज मनोज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मनोज वाजपेयी त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सगळ्यांना माहितीच आहे. तो नेहमीच चॅलेंजिंग रोल स्वीकारत असतो. मग त्याचा मागच्या वर्षी आलेला "अलिगड' असो वा शॉर्टफिल्म "तांडव'. त्याच्या या प्रोफेशनालिझमचे आणि अभिनयाचे अनेक जण चाहते आहेत. तो आणि राम गोपाल वर्मा यांची दोस्ती फार जुनी. "सत्या'पासूनची त्यांची ओळख. आता तो राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर "सरकार 3' मध्ये काम करतोय. त्याचं विशेष कौतुक म्हणजे त्याने दिलेल्या तारखांच्या आधीच सगळं चित्रीकरण संपवलं. त्याचा एक सीन बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर होता आणि त्याला एकाच शॉटमध्ये न थांबता 30 ओळी सलग बोलायच्या होत्या.

मनोज वाजपेयी त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सगळ्यांना माहितीच आहे. तो नेहमीच चॅलेंजिंग रोल स्वीकारत असतो. मग त्याचा मागच्या वर्षी आलेला "अलिगड' असो वा शॉर्टफिल्म "तांडव'. त्याच्या या प्रोफेशनालिझमचे आणि अभिनयाचे अनेक जण चाहते आहेत. तो आणि राम गोपाल वर्मा यांची दोस्ती फार जुनी. "सत्या'पासूनची त्यांची ओळख. आता तो राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर "सरकार 3' मध्ये काम करतोय. त्याचं विशेष कौतुक म्हणजे त्याने दिलेल्या तारखांच्या आधीच सगळं चित्रीकरण संपवलं. त्याचा एक सीन बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर होता आणि त्याला एकाच शॉटमध्ये न थांबता 30 ओळी सलग बोलायच्या होत्या. या पठ्ठ्याने हे काम अगदी सहजपणे करून दाखवलं. मनोजच्या या प्रयत्नांमुळे आणि डेडिकेशनमुळे तो दिलेल्या दिवसांपेक्षा कमी वेळात शूिंटग संपवून मोकळा झाला. तो म्हणतो, "अमितजींबरोबर काम करण्याचा अनुभव खूप ग्रेट होता. या चित्रपटाचं शूटिंग हा माझ्यासाठी ग्रेट एक्‍सपिरिअन्स होता. मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि कळल्या.' तो "सरकार 3' बरोबरच "लव सोनिया', "इन द शॅडो', "मिसिंग', "नाम शबाना' हेही चित्रपट करतोय. 
 

Web Title: manoj bajpai