कतरिना चक्क मनोज वाजपेयीच्या पडली पाया! काय होतं कारण?|Manoj Bajpayee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Bajpayee

Manoj Bajpayee : कतरिना चक्क मनोज वाजपेयीच्या पडली पाया! काय होतं कारण?

Manoj Bajpayee Actor Sirf Ek Banda Kaafi Hai Tabbu : बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे मनोज वाजपेयी अनेकांना माहिती आहे. त्यानं त्याच्या अभिनयाच्या जोरावर स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. येत्या दिवसांत त्याचा सिर्फ एक बंदा काफी है नावाचा चित्रपट येतो आहे. सध्या तो त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचेही दिसून आले आहे.

मनोज वाजपेयीचं कौतूक करणाऱ्या इतर बॉलीवूड सेलिब्रेटींची संख्याही मोठी आहे. त्यामध्ये अनेक दिग्गज सेलिब्रेटींचा त्यात समावेश आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू आणि कतरिना यांच्या नावाचा समावेश आहे. मनोजनं त्याच्या एका मुलाखतीतून कतरिना आणि तब्बू यांच्याविषयीची एक आठवण सांगितली आहे. ज्यात तब्बू आणि कतरिना आपल्या पाया पडल्याचे मनोजनं सांगितले आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

तब्बू सोबत मनोज वाजपेयीनं मिसिंग आणि दिल पे मत ले यार नावाचे चित्रपट केले आहेत. या दोन्ही कलाकारांमध्ये चांगली मैत्री आहे. त्यांच्यात चांगला संवादही असल्याचे यावेळी मनोजनं सांगितले. मनोजनं यावेळी सांगितले की, तब्बू आणि कतरिना यांनी अनेकदा माझ्याबाबत आदराची भावना व्यक्त केली आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मनोजनं २०१० मध्ये कतरिनासोबतही काम केले होते.

२०१० मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी राजनिती नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या प्रीमिअरला सगळे सेलिब्रेटी उपस्थित होते. त्यावेळी झा यांनी सगळ्यांना एकत्रित फोटो काढण्यासाठी बोलावले. त्यावेळी कतरिना ही मनोजजवळ गेली आणि ती त्याच्या पायाही पडली. त्याला म्हणाली की, तुम्ही खूपच प्रभावी अभिनेता आहेस. त्यानंतर मनोज खूप हरखून गेला होता. त्यानं कतरिनाला धन्यवाद दिले होते.