'बॉलीवूडमधील काही श्रीमंत लोकं आमच्या सारख्यांना...' मनोज वाजपेयी बोलून गेला| Manoj Bajpyee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manoj bajpayee

Manoj Bajpyee : 'बॉलीवूडमधील काही श्रीमंत लोकं आमच्या सारख्यांना...' मनोज वाजपेयी बोलून गेला

Manoj Bajpayee says he’s not ‘rich’ after paps inform him : सपने में मिलती है कुडी मेरी....राम गोपाल वर्मा यांच्या सत्या चित्रपटातून भिकु म्हात्रेची भूमिका करणारा मनोज वाजपेयी हा आता बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता झाला आहे. वेब सीरिज, फिल्म, यासारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यानं आपली चुणूक दाखवून दिली आहे आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

त्याचे झाले असे की, मुंबई विमानतळावर मनोज वाजपेयी त्याच्या कुटूंबियांसमवेत दिसून आला. त्यावेळी पापाराझ्झींनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारुन हैराण केले. मात्र मनोजनं मोठ्या चातुर्यानं त्यांना उत्तर देत आपली सुटका करुन घेतली आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडताना दिसतो आहे.

Also read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Anant Radhika Roka: मुकेश अंबानींच्या मुलाचा 'रोका' दणक्यात!

मनोजजी सध्या हॉलिडे सुरु आहे. तेव्हा बॉलीवूडमधील सगळे सेलिब्रेटी बाहेर देशात चालले आहेत. तुम्ही पण कुठे जाणार आहात की नाही, त्यावर मनोजनं दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांना आवडली आहे. मनोज म्हणतो, जी लोकं फारशी श्रीमंत नसतात थोडक्यात माझ्यासारखी लोकं त्यांनाही कधी कधी जाण्याची संधी मिळते. त्याचे उत्तर ऐकून फोटोग्राफर्सला हसू आवरत नाही.

मनोजच्या आगामी वर्कप्रोजेक्ट विषयी सांगायचे झाल्यास, नेटफ्लिक्सच्या गुलमोहर नावाच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये त्याच्या जोडीला कोंकणा सेन शर्मा दिसणार आहे. अनुराग कश्यप यांच्या गँग्स ऑफ वासेपूरमध्ये मनोज वाजपेयीनं महत्वाची भूमिका साकारली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा: Anant Radhika Roka: कोण आहेत अंबानी कुटूंबाच्या धाकट्या सुनबाई? अनंतचं लवकरच शुभमंगल!

यासगळ्यात काही नेटकऱ्यांनी त्या फोटोवर कमेंट करताना मनोजच्या मुलीचे अवाचे कौतूक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनोजची मुलगी खूप सुंदर आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, टीपिकल फॅमिली मॅन असणारा कलाकार. तिसऱ्यानंतर मनोज तुमची फॅमिली मॅनचा तिसरा सीझन केव्हा प्रदर्शित होणार आहे....यावेळी मनोजच्या फॅमिलीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.