आयुष्यात घडलेल्या 'या' मोठ्या घटनेमुळे Manoj Bajpayee च्या मनात आला आत्महत्येचा विचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manoj bajpayee, manoj bajpayee news, manoj bajpayee webseries

आयुष्यात घडलेल्या 'या' मोठ्या घटनेमुळे Manoj Bajpayee च्या मनात आला आत्महत्येचा विचार

Manoj Bajpayee News: मनोज बाजपेयी सत्या मधल्या भिकू म्हात्रे या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाले. भिकू म्हात्रेच्या भूमिकेमुळे मनोज वाजपेयी यांच्या करियरची गाडी सुसाट सुरु झाली.

मनोज वाजपेयींनी आज जरी यशाच्या शिखरावर असले तरीही एककाळ असा होता जेव्हा मनोज वाजपेयींच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते. काय झालं होतं नेमकं? बघूया

(Manoj Bajpayee thought of suicide due to 'this' big incident in his life)

मनोज वाजपेयी यांना शिक्षण पूर्ण करून NSD (National School Of Drama) मध्ये जाण्याची नेहमीच इच्छा होती. परंतु जेव्हा NSD मध्ये मनोज वाजपेयी यांना प्रवेश मिळाला नाही तेव्हा त्यांच्यावर खोल परिणाम झाला.

मनोज वाजपेयी म्हणतात, "NSD मध्ये प्रवेश नाकारल्यानंतर, मला वाटले की माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतले गेले आहे. कारण माझ्याकडे कधीही प्लॅन बी नव्हता."

मनोज वाजपेयी पुढे म्हणतात, “जेव्हा मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेलो, त्याआधी 3 वर्षांत माझ्याकडे रंगभूमी आणि नाटकाचा खूप अनुभव होता. पण तरीही मला प्रवेश नाकारण्यात आला. अगदी आत्महत्येचे विचार सुद्धा आले.

त्यानंतर एक महिना माझ्या मित्रांनी मला पाठिंबा दिला आणि मला नैराश्यातून बाहेर काढले. पुढे मी करियर आणि आयुष्याचा नवीन मार्ग शोधू लागलो.

शेवटी, मंडी हाऊसमध्ये, NSD च्या माजी विद्यार्थ्यांचा एक थिएटर ग्रुप 365 दिवसांचं वर्कशॉप आयोजित करत होता त्यात सहभागी झालो. आणि त्या वर्कशॉप मधून मी खऱ्या अर्थाने शिकलो”

एकेकाळी आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या मनोज वाजपेयींनी पुढे आयुष्याचा सकारात्मक दृष्टिकोन पुढे घेऊन अभिनय क्षेत्रात यशस्वी करिअर केलं. मनोज वाजपेयींची भूमिका असलेला गुलमोहर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

याशिवाय आगामी काळात मनोज वाजपेयींची प्रमुख भूमिका असलेली The Family Man 3 हि वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :Marathi News Bollywood