अभिज्ञा भावे वेबसीरिजमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

‘झी  मराठी’वरच्या ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील मोनिका म्हणून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेने ‘मुव्हिंग आऊट’ या नुकत्याच सुरू झालेल्या वेबसीरिजमध्ये अभिनय केलाय. अभिज्ञा भावेचा हा पहिलाच अनुभव आहे. या वेबसीरिजमध्ये तिने घर सोडून गेलेल्या एका मुलीची भूमिका केलीय. तिच्या आयुष्यात तिला काय हवं आहे याचा शोध घेण्याचा तिचा प्रवास दाखवलाय. या वेबसीरिजबद्दल अभिज्ञा म्हणाली, ‘ही कथा  आजच्या काळातल्या मुलींची आहे. मुलींकडून नेहमी दोन विरुद्ध अपेक्षा केल्या जातात.

तिने घरही सांभाळलं पाहिजे आणि नोकरीही केली पाहिजे. लग्नाआधी आई-वडिलांच्या; तर लग्नानंतर नवऱ्याच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. नेहमीच तिच्या आयुष्यात शंकांचं काहूर माजलेलं असतं. स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची तिची धडपड सुरू असते. मग नेहमी स्वत-च्या मनातील विचारांवर ठाम राहणाऱ्या मुलींना वाया गेल्याचा टॅग लावला जातो. ही कथा रेवा नावाच्या मुलीची आहे; जी स्वतःच्या विचारांवर ठाम आहे आणि ते कोणीतरी समजून घ्यावं, हीच तिची अपेक्षा आहे. मी ही वेबसीरिज म्हणून याकडे न पाहता एक चांगली कथा आणि चांगली भूमिका म्हणून याकडे पाहतेय. त्यामुळे मला काम करायला खूप मजा येतेय.’ ‘मुव्हिंग आऊट’ ही वेबसीरिज दहा भागांची असणार आहे आणि ती ‘रिव्हर्ब कट्टा यू-ट्युब’ चॅनेलवर प्रदर्शित झालीय.

Web Title: manoranjan news abhidnya bhave in webseries