येतोय ‘प्रभो शिवाजी राजा’ ॲनिमेशनपट

येतोय ‘प्रभो शिवाजी राजा’ ॲनिमेशनपट

आजच्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम व इतिहास ॲनिमेशन स्वरूपात मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत. हा अनोखा उपक्रम ‘प्रभो शिवाजी राजा’ या ॲनिमेशनपटाद्वारे प्रथमच केला जातोय. ‘गणराज असोसिएट्‌स’ प्रस्तुत; तसेच इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफॅक निर्मित हा ॲनिमेशनपट नीलेश मुळे यांनी दिग्दर्शित केलाय.

शिवाजी महाराजांचा कालखंड मांडणाऱ्या या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे, मराठीतील दिग्गज कलाकारांची नावं यात जोडली गेली आहेत. समीर मुळे लिखित या ॲनिमेशनपटासाठी ख्यातनाम इतिहासकार निनाद बेडेकर यांनी संवाद आणि पटकथेचं सहायक लेखन केलंय. तसंच ज्येष्ठ इतिहासकारांची निरीक्षणं वापरून या चित्रपटाची कथा सादर करण्यात आलीय. ख्यातनाम चित्रकार सदाशिव भाऊ साठे यांच्या कुंचल्यातून यातील पात्रं रेखाटली गेलीत. शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, श्रीरंग भावे, नंदेश उमप आणि उदेश उमप या गायकांची गाणीही या चित्रपटात आकर्षणाचा विषय ठरणार आहेत. या सिनेमातली सर्व गाणी प्रकाश राणे यांनी लिहिली असून, भारत बलवल्ली यांचं संगीत त्याला लाभलंय. सचिन खेडेकर आणि सुदेश भोसले यांच्या भारदस्त आवाजातील निवेदन यात असून, शिवाजी महाराजांना अभिनेता उमेश कामत आणि धर्मेंद्र गोहिल यांनी आवाज दिलाय. हा चित्रपट १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com