पाकिस्तानातही "सैराट'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत बॉक्‍स ऑफिसवर विक्रमी कमाई करणाऱ्या "सैराट' चित्रपटाला प्रदर्शित होऊन दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र, अद्याप या चित्रपटाची जादू रसिक मनावर कायम आहे. "सैराट'ने मराठीच नव्हे; तर देशभरातील प्रेक्षकांनाही भुरळ घातली. आता, सैराट पाकिस्तानी प्रेक्षकांनाही भुरळ पाडणार आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पीफ) बॉलिवूडच्या मोजक्‍या चित्रपटांसोबत "सैराट'ही दाखवला जाणार आहे. कराचीमध्ये गुरुवारपासून (ता. 29) "पीफ' महोत्सव सुरू होणार आहे. 1 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात "डिअर जिंदगी', "आँखो देखी', "हिंदी मीडियम', "कडवी हवा', "नील बटे सन्नाटा' "बाहुबली' या चित्रपटांची निवड झाली आहे.
Web Title: manoranjan news sairat movie in pakistan