मानसीच्या लग्नाला यायचं हं! पाहा फोटो

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

नुकताच मानसीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बॅचलर पार्टीचा व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केला होता. मानसीने तिची खास मैत्रिणी सीमा कदम आणि दिपाली सय्यद यांच्या सोबत बॅचलर पार्टी सेलिब्रेट केली. यावेळी बॅचलर पार्टी केक कट करतानाचा व्हिडिओ 'ये दोस्ती' असे कॅप्शन देऊन पोस्ट केला होता. 

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीत कातिल अदा आणि डान्स नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. तिच्या सोशल मिडियावरील पोस्टला चाहत्यांची नेहमीच खूप पसंती मिळते. मानसी नाईक लवकरच आपला बॉयफ्रेंड प्रदीप खरे सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मानसीने एका इंग्रजी वृत्तपात्राला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले होते कि १९ जानेवारीला प्रदीप खरे सोबत तीचे लग्न  होणार आहे.

मराठी चित्रपट सृष्टीत अदा आणि नृत्यमाविष्कारामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. तिच्या सोशल मिडियावरील पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळते.  मानसी सध्या  'ढोलकीच्या तालावर' या मराठी रिऍलिटी शोच्या माध्यमातून प्रेकक्षकांच्या भेटीला आली होती. ''वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात तिने विशेष स्थान मिळवले होते.

नुकताच मानसीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बॅचलर पार्टीचा व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केला होता. मानसीने तिची खास मैत्रिणी सीमा कदम आणि दिपाली सय्यद यांच्या सोबत बॅचलर पार्टी सेलिब्रेट केली. यावेळी बॅचलर पार्टी केक कट करतानाचा व्हिडिओ 'ये दोस्ती' असे कॅप्शन देऊन पोस्ट केला होता. 

मानसीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचा मेहंदी, हळद आणि संगीत  सोहळा नुकताच पार पडला आहे. याबाबत तिने ''नव्या अयुष्यासाठी मी उत्सुक आहे'', असे ती म्हणाली. सर्वात प्रथम ग्रहम विधीपार पडला. या विधीला मानसीने निळ्या रंगाची साडी नेसली होती. डोक्याला मुंडावळ्या बांधून ग्रहम विधीची पूजा करतानाचे फोटो मानसीने पोस्ट केले होते. 

त्यानंतर मेहंदी सोहळा झाला. ज्यामध्ये मानसीने पिस्ता कलरचा ड्रेस घातला होता. फुलांचे दागिने घालून मानसी मेहंदी काढून घेताना मानसी खूप सुंदर दिसत होती.

त्याच दिवशी मानसीचा संगीत कार्यक्रम झाला. तिच्या संगीत सोहळ्यात 'ये गलियाँ, ये चौबारा' या गाण्यावर मानसीने डान्स केला. मानसीची खास मैत्रीण दिपाली सैय्यदने संगीत कार्यक्रमात लावणी  सादर केली. मानसीच्या आई आणि वडिलांनी 'ए मेरी जोहर जबी' या गाण्यावर डान्स केला. या कार्यक्रमात मानसीच्या सर्व कुटुंबाने खूप एन्जॉय केले. 

आज मानसीचा लग्न सोहळा आहे. सकाळी हळदीचा कार्यक्रम पार पडला ज्यात मानसी आणि प्रदीप मुंडावळ्या बांधून जोडीने सर्वांकडून हळद लावून घेत आशीर्वाद घेतले होते. मानसीचे लग्नविधी झाले आहेत. तिच्या अक्षदांचे आणि विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नात मानसीने गुलाबी रंगाचा लेहंग्यामध्ये सुंदर दिसतेय तर प्रदीप सोनेरी रंगाच्या शेरवानीमध्ये रुबाबदार दिसत आहे. कार्यक्रमांच्या फोटो आणि व्हिडिओला मानसीच्या चाहत्यांची पसंती मिळत आहे. सर्वानी मानसी आणि प्रदीपला शुभेच्छा दिल्या आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mansi Naik got Married with Pradeep Khare