मानुषी बनणार अक्षयची प्रेयसी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

‘मिस वर्ल्ड २०१७’  विजेत्या मानुषी छिल्लरच्या बॉलीवूड पदार्पणाच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या

मुंबई : ‘मिस वर्ल्ड २०१७’  विजेत्या मानुषी छिल्लरच्या बॉलीवूड पदार्पणाच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. ती ‘पृथ्वीराज’ चित्रपटात झळकणार असल्याचीही बरीच चर्चा होती. मात्र या चर्चा आता खऱ्या ठरताना पाहायला मिळत आहेत. मानुषी ‘पृथ्वीराज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार मुख्य भूमिकेत असेल; तर मानुषी अक्षयची प्रेयसी ‘संयोगिता’ची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांचा बायोपिक असणार आहे. ‘यशराज फिल्म्स’च्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती होणार आहे; तर चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत द्विवेदी करणार आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manushi will play Akshay's lovers role