‘लक डाउन’ मधून अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी झळकणार

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 December 2020

ब-याच काळानंतर अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी हे एका चित्रपटात दिसणार आहेत.

मुंबई - ब-याच दिवसानंतर एक नवा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यात प्रसिध्द कलाकार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी हे एकत्रित दिसणार आहे. संतोष रामदास मांजरेकर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नवीन चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. आता ती उत्सुकता संपली आहे.

इष्णव मीडिया हाऊस प्रस्तुत आणि दर्शन फुलपगार निर्मित ‘लक डाउन’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त जुन्नर येथे पार पडला. यावेळी विशेष पाहुणे म्हणून चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. ब-याच काळानंतर अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी हे एका चित्रपटात दिसणार आहेत. 'अगर आज जट बिगड गया ना तो, मनाली टू मुंबई टट्टिया करती जायेगी'

'अगर आज जट बिगड गया ना तो, मनाली टू मुंबई टट्टिया करती जायेगी'

याप्रसंगी माजी आमदार शरद  सोनावणे (शिवजन्म भूमी), विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, युवासेना अध्यक्ष गणेश कवडे, नगर अध्यक्ष श्याम पांड्ये (जुन्नर नगर पालिका) आणि पी.आय. युवराज मोहिते हे यावेळी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये निराशेचे वातावरण दिसून आले आहे. त्याचा परिणाम चित्रपट निर्मितीवर होत आहे.

हे ही वाचा: सैफ अली खानला वाटतंय मुलगा इब्राहीमने बॉलीवूडमध्ये 'या' अभिनेत्यासारखी करावी धमाकेदार एंट्री  

सध्या वातावरण थोडसं निवळलं आहे. तसेच थिएटर सुरु झाली आहेत. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना दिलासा देण्यासाठी नवीन चित्रपट महत्वाचा ठरणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वीही अनेक चित्रपटांना चित्रिकरण करण्यात अडथळे येत होते. त्यावर त्यांनी मात करत त्या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केले आहे. असाच आणखी एक चित्रपट म्हणजे ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटालाही लॉकडाऊनचा सामना करावा लागला होता. अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली आहे.

  शेतक-यांच्या आंदोलनावर अभिनेता सोनू सूदने दिली प्रतिक्रिया  

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे केवळ तीन दिवसाचे शूटिंग बाकी होते आणि त्याची संपूर्ण तयारी झाली असताना लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे शूटिंग थांबवावे लागले होते. कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग सलगपणे करणे निर्मात्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत असते, कारण मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी उभारले जाणारे भव्य सेट, त्या काळाची वातावरण निर्मिती याचा मोठा खर्च निर्मात्यांना उचलावा लागत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actor ankush chaudhari actress prajakta mali luck down new movie lockdown