कॅमेरा अधिक आवडतो! : आशुतोष कुलकर्णी (रॅपिड फायर)

तन्मयी मेहेंदळे
मंगळवार, 4 जुलै 2017

तू दिवसाची सुरवात कशी करतोस?
- मी सकाळी साडेसहाला उठून लिंबू-मध-पाणी घेतो. सकाळी-सकाळी भूक लागते त्यामुळे काहीतरी खातो.

तू दिवसाची सुरवात कशी करतोस?
- मी सकाळी साडेसहाला उठून लिंबू-मध-पाणी घेतो. सकाळी-सकाळी भूक लागते त्यामुळे काहीतरी खातो.

आईच्या हातची कोणती डिश आवडते?
- भिशिबिळी अन्ना हा कन्नड खाद्यप्रकार मला खूप आवडतो.

सिनेमा, नाटक, मालिका यापैकी कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं?
- सिनेमा जास्त आवडतो. मला कॅमेरा हे माध्यम जास्त आवडते आणि भावते; पण तीनही माध्यमांत मला काम करायला आवडेल.

फॅशन फंडा काय आहे?
- कॉटनचे कपडे आणि कॉलरचे शर्ट घालणे हे जास्त आवडते!

छंद कोणते?
- कॅंडिड फोटोग्राफी, आरोग्यविषयक अभ्यास आणि मानसशास्त्र विषयातील वाचन करणे, कार ड्रायव्हिंग.

लहानपणीची कोणती गोष्ट मिस करतोस?
- उन्हाळ्याची सुटी! बाहेर जाताना मी बाबांच्या गाडीवर पुढे उभा राहायचो ते मिस करतो.

जीवनातील आदर्श कोण आहेत?
- मला खूप आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे गोंदवले या गावाचा. हे माझं मूळ गाव असून तिकडचे गोंदवलेकर महाराज आणि त्यांचे विचार हेच माझ्यासाठी आयुष्यातील आदर्श आहेत.

तुझी स्वतःची सर्वांत आवडलेली भूमिका?
- मला "असंभव' या मालिकेतील "स्वप्नील' ही भूमिका!

संधी मिळाल्यास अभिनय क्षेत्रात काय बदल करशील?
- इंडस्ट्रीत प्रॉडक्‍शनला जे लोक काम करतात त्यांच्यासाठी उत्तम दर्जाचा कोर्स आणि अभ्यासक्रम सुरू करता आला तर निश्‍चितच करेन.

आवडते नाटक?
- मराठी थिएटर्स अकादमीचं "महानिर्वाण' आणि "नटसम्राट'.

नवीन प्रोजेक्‍ट्‌स?
- एक मराठी चित्रपट करत असून, सध्या "लेक माझी लाडकी' मालिकेत काम करत आहे.

Web Title: marathi actor ashutosh kulkarni rapid fire round