किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत, आता महामानवांच्या विचारावर केलं भाष्य

महामानवांच्या जयंतीवर बोलताय किरण माने.यावर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं दिसतंय.
Marathi Actor Kiran Mane Has been Invited For
Marathi Actor Kiran Mane Has been Invited For esakal

प्रत्येक विषयावर आवर्जून बोलायला आवडतं किरण मानेंना.अलीकडेच त्यांनी केलेली पोस्ट परत एकदा चर्चेत आलीये.महामानवांच्या जयंतीवर बोलताय किरण माने.(Kiran Mane)यावर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं दिसतंय.त्यांची ही पोस्ट चर्चेत चाललीय सध्या.महामानवांच्या जयंत्या साजऱ्या कराव्या पण त्यात कृतज्ञता असावी असे त्यांचे म्हणणे आहे.पुढे यावर ते सविस्तर बोलतात.तशी लिहीलेली पोस्टही त्यांनी फेसबुकला टाकली आहे.

माने काय लिहीतात त्यांच्या पोस्टमधे ?

"...जयंती जरूर साजरी करावी. आपल्या महामानवांविषयीची कृतज्ञता असते ती. पण मला लै मनापास्नं असं वाटतं की, ही जयंती डिजे लावून, मिरवणूका काढून नाही, तर त्यांच्या विचारांचे पुन:पुन्हा स्मरण करून, ते विचार आजच्या गढूळ झालेल्या भवतालात कसे मार्गदर्शक ठरतील यावर चर्चा करून साजरी व्हावी. असं काम करणारे लोक जेव्हा मला आवर्जुन संवाद साधायला बोलावतात तेव्हा लै लै लै समाधान वाटतं दोस्तांनो !"असे त्यांनी त्यांच्या पोस्टमधे लिहीले आहे.

Marathi Actor Kiran Mane Has been Invited For
Kiran Gaikwad : वाटल नव्हत की देवमाणूस शूट करताना असा काही सिक्वेन्स शूट करावा लागेल ? ; पाहा व्हिडीओ

पुढे त्यांनी पोस्टमधे त्यांना आमंत्रित केलेल्या कार्यक्रमांद्दल लिहीले आहे."बुद्धजयंती आणि छ. संभाजी महाराज जयंती उत्सवात आपणा सर्वांबरोबर बोलायला येतोय..."असे ते म्हणाले.या महामानवाच्या जयंती झाल्या असल्या तरी १३ मे ते १६ मे पर्यंत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि बुद्धजयंती यांच्या कार्यक्रमांना बोलावण्यात आले आहे.यामधे १३ मे ला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या ठिकाणी त्यांना छ. संभाजी महाराज जयंती उत्सवासाठी बोलावण्यात आले आहे.तर १४ मे ला मुंबईत भारत एकता मिशन तर्फे जयंती साजरी न करता जयंती सोहळ्यासाठी जमा झालेले पैसे वाचवून मानेंच्या हस्ते गरीब हुशार विद्यार्थ्यांना तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना रोख आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com