esakal | 'हा फक्त पैशांचा माज', आर्यन प्रकरणावर अभिनेते विजय पाटकरांची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

'हा फक्त पैशांचा माज', ड्रग्ज प्रकरणावर अभिनेते विजय पाटकरांची प्रतिक्रिया

'हा फक्त पैशांचा माज', ड्रग्ज प्रकरणावर अभिनेते विजय पाटकरांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - गोवा कॉर्टिला क्रुझवर जी रेड टाकण्यात आली होती त्यात एनसीबीनं मोठी कारवाई केली आहे. ज्यामुळे सगळयांचे लक्ष वेधलं आहे. यात बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान याचेही नाव समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यासगळ्यात अनेक सेलिब्रेटींनी आता सोशल मीडियावरुन या प्रकरणाविषयी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचीही प्रतिक्रिया सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी परख़ड शब्दांत याप्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. बॉलीवूडमध्ये बराच काळ कार्यरत असून आता ज्याप्रकारे कारवाया होत आहेत ते पाहून त्यांनी प्रशासनाचं आभारही मानलं आहे.

हे फारच दुर्देवी आहे की आज एका सुपरस्टारच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. हे खूप दुर्देवी देखील आहे. आता कुठे थिएटर सुरु होणार म्हणून आम्हाला काही अंशी दिलासा मिळाला होता. कोरोनामुळे अनेक संकटांचा सामना केल्यानंतर सगळ पूर्ववत होणार होतं. त्यात हा झालेला प्रकार निराशा करणारा आहे. नाट्यगृहेही सुरु होणार आहे. मात्र ही सुरुवात अशाप्रकारे होते आहे हे सगळ्यात दुर्देवी आहे. हे जे काही आहे तो सगळा अति पैशांचा माज आहे. माझ्याकड़े पैसे आहेत, मी वाट्टेल ते करु शकतो, राजकीय सगळ्या गोष्टीही हँडल करु शकतो हा फक्त आणि फक्त माज आहे. असं माझं स्पष्ट आणि परखड मत आहे.

यापुढे विजय पाटकर म्हणाले, मागे एकदा मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलच्या दरम्यानही ही गोष्ट घडली होती. तेव्हा आपण त्या कलाकाराचं वागणं आपण पाहिलं होतं. मी समीर वानखेडे यांना खूप खूप धन्यवाद देईल. बऱ्याच वर्षांनंतर अशा प्रकारच्या धडाधड कारवाया होत आहेत. ते पाहून बरं वाटतं. मी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच काही गोष्टी पाहिल्या आहेत. पण त्या इतक्या बाहेर आल्या नव्हत्या. प्रमाण फार कमी होते. आम्हाला वाट्टेल ते करु, आम्हाला कोण अडवणार, आणि आता तो माज उतरतोय. वानखेडे आणि सरकार उतरवतंय. त्यांचे मी खूप अभिनंदन करतो. आभारही मानतो. या शब्दांत पाटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: अभिनेते मनोज वाजपेयीच्या वडिलांचे निधन

हेही वाचा: आर्यनची NCB नं चौकशी केल्याचं कळताच, शाहरुखनं सोडलं पठाणचं शुटींग

loading image
go to top