मराठी कलाकारांकडून का व्हायरल होतोय #पुन्हानिवडणूक ट्रेंड?

टीम ईसकाळ
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

मराठी चित्रपटसृष्टीतील सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग ट्विट केले आहे

मुंबई : सध्या राजकीय वारं सगळ्याच बाजूने तापलेलं असताना कलाकारही त्यात उतरले आहेत. महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. यातच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाआघाडी बनवून सत्तास्थापनेच्या तयारीत असतानाच फडणवीस म्हणत आहेत की सहा महिन्यांनी पुन्हा भाजपचे सरकार येईल. त्यामुळे आता कोणत्या पक्षाकडून सत्तास्थापन होईल किंवा पुन्हा निवडणूका लागतील याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी व नेटकऱ्यांनी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे.

लग्नाआधीच 'ही' अभिनेत्री आहे प्रेग्नंट?

मराठी चित्रपटसृष्टीतील सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग ट्विट केले आहे. पण अचानक असा हॅशटॅग ट्रेंड झाल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. तर भाजपला पाठिंबा देण्यासाठीच हा ट्रेंड सुरू करण्यात आलाय का, असा सवाल ट्विटरवर उपस्थित होतोय. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कॅम्पेनसाठी खेळाडूंनी हॅशटॅगद्वारे मोदींना पाठिंबा दिला होता.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

 

 

 

मोदींनी #FitIndiaMovement हा हॅशटॅग ट्रेंड करून निरोगी भारतासाठी कॅम्पेन केले होते. या कॅम्पेनमध्ये सर्व भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. पण, राज्याला मुख्यमंत्री हवा असताना आणि या सत्तासंघर्षांच्या पेचप्रसंगातून सुटण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार हवे असताना #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग का सुरू झाला असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi actors twitting a hashtag about re elections