अभिज्ञा-मेहुलचं समुद्रकिनारी 'रोमँटिक' फोटोशूट ; फोटो केले शेअर

टीम ई सकाळ
Thursday, 14 January 2021

लग्नानंतरचा पहिला सण मकर संक्रातीला अभिज्ञा आणि मेहुलने एक खास फोटोशूट केले आहे.या फोटोशूटचे फोटो अभिज्ञाने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे ही सध्या तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे. युथ फॅशन आयकॉन म्हणून तिची ओळख आहे. तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच फोटोंची चर्चा होत असते. मराठीमध्ये रंग माझा वेगळा, खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे यांसारख्या मालिकांमधून तिने काम केलं आहे. मुव्हींग आउट या मराठी वेबसिरीजमध्ये तिने रेवा या व्यक्तीरेखेची भूमिका केली होती. याशिवाय इतरही काही मालिकांमधून ती छोट्या पडद्यावर दिसली आहे. 

अभिज्ञा सोशल मीडियावर सक्रीय असते. अधून मधून ती फोटो पोस्ट करते. नेटकरीही मराठमोळ्या अभिज्ञाच्या फोटोंचे कौतुक करत असतात. गेल्याच आठवड्यात ती मेहुल पै सोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अभिज्ञाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांनी ही बातमी दिली.

अभिज्ञा आणि मेहुल यांनी सेलिब्रेटी मित्र मैत्रिणी आणि मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यांच्या लग्नाला  श्रेया बुगडे , तेजस्विनी पंडित, रेश्मा शिंदे, सौरभ गोखले या कलाकारांनी अभिज्ञाच्या लग्नाला हजेरी लावली होती. 

पाहा फोटो - सनीलाही लाजवेल असं प्राजक्ताचं 'जबरी' फोटोशुट

लग्नआधी व लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्याचं फोटोशूट करण्याचा ट्रेंड साध्य सोशल मीडियावर आहे. अनेक जोडपी वेगवेगळ्या लोकेशन्सला वेगवेगळे कपडे घालून रोमँटिक पोझ देऊन फोटोशूट करत असतात असेच एक फोटोशूट अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने केले आहे.

लग्नानंतरचा पहिला सण मकर संक्रातीला अभिज्ञा आणि मेहुलने एक खास फोटोशूट केले आहे.या फोटोशूटचे फोटो अभिज्ञाने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये अभिज्ञाने काळी साडी नेसलीअसून डोक्यात लाल रंगाचे फुल घातले आहे मराठमोळ्या लुक मध्ये अभिज्ञा सुंदर दिसत आहे  मेहुलने काळा आणि सोनेरी कुर्ता घातला आहे. समुद्र किनारी हातात हात घालून दोघे फिरत आहेत असे या फोटोमध्ये दिसत आहे. अभिज्ञाच्या चाहत्यांनी कमेंट करून तिला मकर संक्रांतीच्या शुभेच्या दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress abhidnya bhave wedding photos social media