"राधिका' साधी, मी थोडी बेरकी! 

Anita date
Anita date

रॅपिड फायर - अनिता दाते-केळकर 

आवडते भटकंतीचे ठिकाण? 
- पुण्याच्या एफ. सी. रोड आणि नाशिकच्या कॉलेज रोडवर फिरायला जास्त आवडते. 
छंद कोणते? 
- मला वाचायला आवडते, नाटक, सिनेमा बघायला आवडते. स्वयंपाक करायला आवडतो. 

सासूच्या हातची कोणती डिश आवडते? 
- खजुराचा पौष्टिक लाडू, त्यांच्या हातच्या कोशिंबिरी आवडतात. 

तुझं शालेय शिक्षण कुठं झालं? अभिनयाची आवड तेव्हापासूनची का? 
- मी मूळची नाशिकची. सारडा विद्या मंदिर ही माझी शाळा आहे. मी शाळेत असताना फक्त एकदाच नाट्यवाचनात भाग घेतला. शाळेत असताना मी कबड्डीपटू होते. 
तुझा पहिला फोन कोणता होता? 
- नोकियाचा बेसिक मॉडेल होता. जो मी पुण्यात आले तेव्हा पैसे साठवून घेतला होता. 
जीवनातील अविस्मरणीय प्रसंग? 
- मी जेव्हा सत्यदेव दुबेंना भेटले तेव्हा खूप छान वाटलं होतं. नंतर मुंबईत आल्यावर त्यांनी त्यांच्या नाटकात घेतलं. 
लहानपणीची कोणती गोष्ट मिस करतेस? 
- लहान असताना आम्ही सगळे वाळूत आणि मातीत खेळायचो, किल्ला बनवायचो, ते दिवस आता मिस करतेय. 
रिकाम्या वेळात काय करतेस? 
- मित्र मैत्रिणींना जमवते आणि भेटते आणि खूप खूप म्हणजे भरपूर गप्पा मारते आणि पुस्तक वाचते. 
तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट? 
- मी पुण्याच्या ललित कला केंद्रातून नाटक विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्या वेळी सतीश आळेकर, राजीव नाईक यांच्यामुळे मला अभिनय समजला आणि गवसला हाच माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट आहे. 
"राधिका' आणि "अनिता' या दोन्हीमधील फरक? 
- "राधिका' ही मनाने साधी आहे, "अनिता' इतकी साधी नसून थोडा बेरकेपणा माझ्यामध्ये आहे. मी "राधिका' पात्राप्रमाणे वास्तवात सहानुभूती खेचत नाही. माझ्या स्वभावाच्या विरुद्ध भूमिका मी वठविली आहे. ती करताना मजा येते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com