'देवमाणूस'मधील डिंपी आहे स्वप्नील जोशीची जबरदस्त फॅन

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 21 November 2020

चॉकलेट बॉय म्हणून सिनेसृष्टीत ओळख असलेल्या स्वप्निलने त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. केवळ सामान्य माणूसंच नाहीत तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील त्याचे चाहते आहेत.

मुंबई- ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अनेकदा वेगवेगळे प्रयोग करुन पाहिले जातात. यावेळी पहिल्यांदाच अभिनेता स्वप्नील जोशी या कार्यक्रमाचा भाग झाला असून यात तो महाराजा प्रदीप सिंग ऊर्फ बच्चू जोशीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. स्वप्निलने खूप चाहते आहेत. चॉकलेट बॉय म्हणून सिनेसृष्टीत ओळख असलेल्या स्वप्निलने त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. केवळ सामान्य माणूसंच नाहीत तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील त्याचे चाहते आहेत. आता अस्मिता देशमुखचंच पाहा ना..

तोडबाज ट्रेलर: ‘मसीहा’च्या भूमिकेत रिफ्युजी कॅम्पमधील मुलांना क्रिकेट शिकवतोय संजय दत्त    

सध्या छोट्या पडद्यावर ‘देवमाणूस’ ही हटके मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती पडतेय.नुकतीच झी मराठीवरिल काही मालिकेतील कलाकारांनी चला हवा येऊ द्याच्या सेटवर हजेरी लावली होती. यामध्ये ‘देवमाणूस’, ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील कलाकार हजर होते.

देवमाणूस या मालिकेतील डिंपी म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुखने चला हवा येऊ द्याच्या सेटवर एका गोष्टीचा खुलासा केला. तिने सांगितलं की स्वप्नील जोशीची खूप मोठी चाहती आहे. स्वप्निल त्याच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी नेहमीच तयार असतो. यावेळीही त्याने या शोच्या सेटवर अस्मितासोबत टिकटिक वाजते  या गाण्यावर डान्स केला. स्वप्निलसोबतचा अस्मिताचा हा परफॉर्मन्स चाहत्यांना खूप आवडला. यावेळी अस्मिता पारंपरिक वेशभूषेत दिसून आली. 

marathi actress asmita deshmukh fan swapnil joshi 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress asmita deshmukh fan swapnil joshi