भिजलेल्या आठवणी 

डॉ. रुपल नंद 
शुक्रवार, 7 जुलै 2017

पाऊस म्हणजे व्यक्त होणं... 

"नितळ तळाच्या काठावरती हिरवे झाड...' 

हे माझं अतिशय आवडतं गाणं. पाऊस म्हटला की वेगवेगळी गाणी मनात रुंजी घालतात. बाहेर मस्त पाऊस पडतोय. त्यामुळे मस्त वातावरण तयार झालंय. मला खूप छान वाटतंय. मलाही खूप भिजावंसं वाटतंय.

पण मी माझ्या भूमिकेच्या वेशभूषेत आहे. मेकअप रूममध्ये बसलेय. त्यामुळे मला भिजता येत नाहीय. पण पावसाविषयीच्या साऱ्या आठवणी अशा डोळ्यासमोर प्ले होतायत. बरेचदा असं होतं की आपल्या मनात असूनही पावसात मनसोक्त भिजता येत नाही.

पण तरीही एकदा तरी वेळ काढून पावसात मनसोक्त भिजा. मीही माझ्या शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढणार आहे. तुम्हीही तुमच्या पावसाविषयीच्या भावना मनात ठेवू नका. व्यक्त व्हा. 

Web Title: marathi actress dr. rupal nanda