ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाची लव्हस्टोरी, ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर पाहिलं अन्...

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 11 November 2020

ईशा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती  गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करतेय. दोघांचे एकत्र फोटो अनेकदा सोशल साईटवर पाहायला मिळतात.  

मुंबई- ‘जय मल्हार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ईशा केसकर. 'जय मल्हार' या पौराणिक मालिकेतील ईशाची बानू ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. आज ११ नोव्हेंबर रोजी ईशाचा वाढदिवस. ईशाचा जन्म ११ नोव्हेंबर १९९१ मध्ये पुण्यात झाला. २०१३ मध्ये ईशाने ‘वुई आर ऑन, होऊन जाऊ द्या’ या सिनेमातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. आज ईशा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती  गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करतेय. दोघांचे एकत्र फोटो अनेकदा सोशल साईटवर पाहायला मिळतात.  

हे ही वाचा: शाहरुख खान 'या' कारणामुळे करत नाही अक्षय कुमारसोबत काम, किंग खानने स्वतः केला खुलासा    

बानु या पात्रामुळे ईशाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. मालिका संपल्यानंतर ईशा प्रेक्षकांना परत कधी भेटणार याची चर्चा सुरु झाली आणि मग ईशाने थेट एंट्री घेतली ती माझ्या नव-याची बायकोमधील प्रसिद्ध पात्र शनायामध्ये. त्यामुळे आता ईशाची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ईशा ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करतेय. ईशा आणि ऋषी एकमेकांसोबतचे फोटो अनेकदा इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. ईशा आणि ऋषीची पहिली भेट ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर झाल्याचं तिने सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली असल्याची चर्चा आहे. ऋषी आणि ईशाच्या नात्याला २९ जुलै रोजी तीन वर्ष पूर्ण झाल्याचं ईशाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं होतं.

सध्या ईशा आणि ऋषी मराठी सिनेसृष्टीमधील सगळ्यांचंच आवडतं कपल म्हणून प्रसिद्ध आहेत.काही दिवसांपूर्वीच ईशाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनायाच्या भूमिकेतून एक्झिट घेतली. ईशाने उपेंद्र सिधये यांच्या ‘गर्लफेंड’ या सिनेमात देखील काम केलं. ईशाला आता पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तसंच या दोघांची रिलेशनशिप लग्नापर्यंत पोहोचलेली पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक आहेत. 

marathi actress isha keskar and actor rishi saxena love story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress isha keskar and actor rishi saxena love story