Maharashtra Din: किती जणांना मारून टाकण्यात आले? महाराष्ट्र दिनी केतकी चितळेच्या पोस्टची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Day, Maharashtra Din Kamgar Din, Maharashtra Din 2023. Maharashtra Day 2023, ketaki chitale

Maharashtra Din: किती जणांना मारून टाकण्यात आले? महाराष्ट्र दिनी केतकी चितळेच्या पोस्टची चर्चा

Ketaki Chitale on Maharashtra Din News: आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ६२ वा महाराष्ट्र दिन. मुंबई या द्विभाषिक राज्यातून आपापली भाषा बोलणारी स्वतंत्र राज्य असावी असा आग्रह मराठी आणि गुजराती लोकांनी धरला होता. यावरूनच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची विभागणी करण्यात आली आणि स्वतंत्र महाराष्ट्र उदयास आले. महाराष्ट्र दिनी अनेक मराठी कलाकार महाराष्ट्राचा गौरव करणाऱ्या पोस्ट करत आहेत. अशातच अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत आहे.

(marathi actress ketaki chitale viral post on maharashtra din)

मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. यात तिने महाराष्ट्र दिनानिमित्त काही प्रश्न विचारले आहेत. किती जणांना मारून टाकण्यात आले?, कुणाच्या वृत्तपत्राचे प्रमुख योगदान ठरले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत?, बॉम्बेचे पहिले मुख्यमंत्री कोण?, फ्लोरा फाउंटनचे हुतात्मा चौक कधी झाले? असे सवाल विचारून केतकीची पोस्ट महाराष्ट्र दिनी पुन्हा चर्चेत आलीय.