अभिनेत्री मुक्ता बर्वेची फेसबूक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली पाहा! |Marathi Actress Mukta Barve Share facebook Post | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Actress Mukta Barve Share facebook Post

अभिनेत्री मुक्ता बर्वेची फेसबूक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली पाहा!

Marathi News: आपल्या परखडपणामुळे नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री (Marathi Actress) म्हणून मुक्ता बर्वेकडे पाहिलं जातं. ती जशी तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहे तशी ती तिच्या ठाम भूमिकेसाठीही ओळखली जाते. मदर्स डेच्या निमित्तानं तिनं सोशल (Mukta Barve) मीडीयावरुन शेयर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. त्यामध्ये तिनं बाईचं माणुसपण हिरावून घेणाऱ्या व्यवस्थेवर तिनं भाष्य़ केलं आहे. तिच्या त्या पोस्टवर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मुक्ताची पोस्ट व्हायरल होत असून त्याची नेटकऱ्यांनी दखल घेतल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील तिनं सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर आपली भूमिका मांडून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

मातृदिनाच्या निमित्ताने अभिनेत्री मुक्ता बर्वे ने 'आईचं बाईपण व बाईचं माणूसपण' या विषयीची सोशल मीडिया वर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ मध्ये मुक्ता बर्वे म्हणते, "बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, कधी तिच्यावर बंधनं लादून, कधी भीती तर कधी स्वप्न दाखवून, धर्म - परंपरा - संस्कृती या सर्वांचं ओझं वाहण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवून आणि हे तिला आणि इतरांना कळूच नये म्हणून की काय, पावलापावलावर तिच्या असण्याचंच गौरविकरण करून बाईचं माणूसपणच हिरावून घेण्याची एक सर्वमान्य व्यवस्था आपल्या आजूबाजूला गेली हजारो वर्षे अस्तित्वात आहे".

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

मातृदिनानिमित्त समाजातील प्रत्येक आईला बाई म्हणून आणि बाईला माणूस म्हणून समजून घेतलं पाहिजे असं आवाहन तिने तिच्या आगामी चित्रपट 'वाय' च्या निमित्ताने सोशल मीडियावर केलंय. अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित चित्रपट 'वाय' हा २४ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Poster Viral: 'हरिओम' मधले ते दोन मावळे आहे तरी कोण?

Web Title: Marathi Actress Mukta Barve Share Facebook Post Mothers Day Celebration Y Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top