esakal | नेहाला मिळालं ‘ग्रॅमी’ साठी नामांकन
sakal

बोलून बातमी शोधा

neha mahajan news of grammy nomination

प्रख्यात दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘बेवक्त बारीश’ मधून तिला पहिल्यांदा संधी मिळाली होती.

नेहाला मिळालं ‘ग्रॅमी’ साठी नामांकन

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मराठी अभिनेत्री नेहा महाजन हिनं आता साता समुद्रापार झेप घेतली आहे. तिचं कौतूक थेट मोठ्या पुरस्काराचं नामांकन मिळालं म्हणून होत आहे. नेहाला लॅटीन पॉप किंग रिकी मार्टीन यांच्या ‘Pausa’ या अल्बमला मानाच्या ‘ग्रॅमी’ पुरस्कारांत नॉमिनेशन मिळाले आहे. सोशल मीडियातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. तिचा सहभाग असलेल्या या अल्बमच्या निमित्तानं मराठी मनाचा गौरव झाला आहे.

तुम्हाला ऐकून नवल वाटेल पण नेहाच्या एका चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. 'छायम पोसिया वीडू' या मल्याळम सिनेमासाठी न्यूड सीन्स दिल्याने नेहा तीन वर्षांपूर्वी अचानक प्रसिद्धीत आली होती. 'द पेटेंड हाऊस' या कादंबरीवर आधारीत 'छायम पोसिया वीडू' या मल्याळम सिनेमात नेहाने एक बोल्ड सीन दिला होता. त्याविषयी सांगताना ती म्हणाली की, पालकांच्या परवानगी नंतरच अशाप्रकारचे दृश्य चित्रित करण्यात आले होते.  भारतात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

या पुरस्काराविषयी सांगताना नेहा म्हणाली की, रिकीसोबतच्या या गाण्याची संधी   मिळाली,  ‘जानेवारी महिन्यात रिकीकडून या गाण्यासाठीचा फोन मला आला. ज्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत सितार वादन करशील का, असे मला विचारले.  मी  होकार दिला. या निमित्ताने काहीतरी नवे शिकण्याची संधी मला मिळाली. नेहा महाजन आणि रिकी मार्टीन ‘Pausa’ या अल्बमला बेस्ट लॅटीन पॉप विभागामध्ये नॉमिनेशन मिळाले आहे.  तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी  शेअर केली आहे. 

सारा अली खानने धनुषसोबत केलं असं वर्कआऊट, व्हिडिओ झाला व्हायरल

नेहानं कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, फ्रेंड्स, मिड नाईट्स चिल्ड्रन या चित्रपटांत काम केलं आहे. मुळची पुण्यातील तळेगाव येथे राहणा-या नेहाचे वडिल पंडित विदुर महाजन प्रसिद्ध सतारवादक आहेत.

हे ही वाचा: ड्रग केसमध्ये जामिन मिळाल्यानंतर सेटवर परतली भारती सिंह, पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट  

प्रख्यात दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘बेवक्त बारीश’ मधून तिला पहिल्यांदा संधी मिळाली होती. राजस्थानी हिंदी असलेला हा सिनेमा करताना भरपूर काही शिकायला मिळाल्याचं नेहा सांगते. 2012 मध्ये नेहाला दीपा मेहता यांच्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या सिनेमात काम करायची संधी मिळाली. 


 

loading image