अनाथ मुलांसोबत पल्लवीने साजरा केला वाढदिवस !

वृत्तसंस्था
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पल्लवी पाटिल हिचा आज (ता. 4 ) वाढदिवस आहे. आजच्या खासदिवशी तिने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीत साजरा केला आहे.

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पल्लवी पाटिल हिचा आज (ता. 4 ) वाढदिवस आहे. आजच्या खासदिवशी तिने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीत साजरा केला आहे. मुंबईतल्या अनाथमुलांसोबत तिने वाढदिवस साजरा केला. त्यावेळी पल्लवीने मुलांसोबत चांगलाच आनंद लुटला. पाहा पल्लवीचे वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ !

पल्लवी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटातून झळकली. अंकुश चौधरी आणि शिवानी सुर्वे यांच्यासोबत ती मुख्य भूमिकेत दिसली. पल्लवी याआधी शेंटीमेंटल, सविता दामोदर परांजपे, बॉइज 2 या चित्रपटांतून झळकली आहे. पल्लवीचा जन्म धुळ्यात झाला आणि जळगावमध्ये ती मोठी झाली. पुण्यातल्या डि.व्हाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून तिनं पदवी घेतली आहे. 'क्लासमेट' या 2015 मध्ये आलेल्या मराठी चित्रपटातून तिनं चित्रपट क्षेत्रात पदार्पणं केलं. क्लासमेटमध्ये 'हिना' या पात्रामधून ती झळकली. 

Image may contain: 15 people, people smiling, people standing

पल्लवी पाटील अभिनयक्षेत्रासोबतच समाजसेवेतही सक्रिय असते.  वेगेगळ्या संस्थांसोबत राहून समाजकार्यात ती हातभार लावण्याचा प्रयत्न करते. हे मोलाचं काम करत असताना ती अनेक समाजसेवी संस्थांसोबत जोडली गेली आहे. समाजसेवेच्या आवडीतूनच तिने आपला वाढदिवस अनाथ मुलांसोबत साजरा करण्याचा विचार केला. 

Image may contain: food

याविषयी मत मांडताना पलल्वी म्हणाली,' मी जळगाव आणि पुण्याजवळच्या सामाजिक संस्थांमध्ये जाऊन काम करते. माझ्या वाढदिवशी मी अनेकदा तिथे किंवा मग आई-वडिलांसोबत गावी असते. पण या वर्षी पहिल्यांदाच कामानिमित्ताने मी मुंबईत असल्याने माझा वाढदिवस इथल्या एका सामाजिक संस्थेतल्या मुलांसोबत साजरा करायचं ठरवलं.' 

Image may contain: 14 people, people smiling, people sitting and people standing

ती म्हणाली, 'वात्सल्य' या सामाजिक संस्थेच्या लहान मुलांना आणि शिक्षकांना भेटून मला वर्षभरासाठी सकारात्मक उर्जा मिळाली आहे. ह्या निरागस मुलांनी माझ्यासाठी गाणी गाऊन आनंद द्विगुणीत केला आहे. हे सेलिब्रेशन माझ्या कायम राहणारं आहे.' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress pallavi patil celebrated her birthday with orphanage kids