'Y' सिनेमात प्राजक्ता हटके भूमिकेत... चाहत्यांना दिलं भलतंच चॅलेंज

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या चाहत्यांना एक खास चॅलेंज दिलं आहे.
marathi actress prajakta mali gives a challenge to her fans and said do surynamskar at yoga day
marathi actress prajakta mali gives a challenge to her fans and said do surynamskar at yoga daysakal

prajakta mali : मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. नुकतीच आलेली 'रानबाजार' वेब सिरिज आणि येऊ घातलेला 'वाय' सिनेमा यामुळे सर्वत्र प्राजक्ताची हवा आहे. रानबाजार या वेब सिरिज मध्ये प्राजक्ताने एका वेश्येची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तीला प्रचंड मेहनत करावी लागली. तितकेच तिच्या भूमिकेचे कौतुकही झाले. तर आता 'वाय' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्राजक्ताने कंबर कसली आहे. या चित्रपटातही तिने अत्यंत वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली आहे. प्राजक्ता आपल्या चाहत्यांशी कायमच संवाद साधत असते. यंदा तिने एक विडिओ पोस्ट करत एक चॅलेंज दिले आहे. (marathi actress prajakta mali gives a challenge to her fans and said do surynamskar at yoga day) (prajakta mali 108 sury namskar)

marathi actress prajakta mali gives a challenge to her fans and said do surynamskar at yoga day
Father's day : बापासोबत आई होणं जरा अवघडच, सिंगल फादर करण आणि तुषारची..

मनोरंजन विश्वाप्रमाणेच प्राजक्ता आणि योग साधना हेही एक समिरकरण आहे. प्राजक्ता बऱ्याचदा आपले योगा करतानाचे फोटो आणि विडिओ शेअर करत असते. असाच एक विडिओ तिने शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चाहत्यांना एक चॅलेंज दिले आहे. प्राजक्ताने या व्हिडिओ मध्ये चक्क १०८ सूर्य नमस्कार घातले आहेत. विशेष म्हणजे न थांबता आणि न थकता प्राजक्ताने ही सूर्यनमस्कार घातले आहेत. सकाळी रम्य वातावरणामध्ये सुर्यनमस्कार आणि व्यायाम करण्याची मजा काही औरच, असं त्या या विडिओत म्हंटली आहे. तर सोबत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. ज्यामध्ये ही चॅलेंज आहे.

प्राजक्ता म्हणते, '१०८ सूर्यनमस्कार.. (जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, आज केले. योगा दिन २१ ला असतो.) कदाचित २१ ला परत करेन, तुम्ही पण माझ्याबरोबर करणार असाल तर …
काय म्हणता, करणार का? (जमेल तितके करा…) (सूर्यनमस्कार घालण्याच्या अनेक पद्धती आहेत… हा मैसूर style हट सूर्यनमस्कार आहे. )' असे म्हणत तिने चाहत्यांना योगा दिनानिमित्त सूर्यनमस्कार घालण्याचे चॅलेंज दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com