शेवटी त्या पेटिंग्स विकण्याचा निर्णय प्रार्थनानं घेतला...

प्रार्थनाने तिच्या पेंटिग्स विकून कोरोना रूग्णांना मदत करायचे ठरवले आहे.
prarthana behere
prarthana behereesakal

मराठी चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.prarthana behere प्रार्थनाला चित्रकलेची प्रचंड आवड आहे. तिला विविध प्रकारच्या पेंटिग्स काढायला आवडतात. लॉकडाऊच्या काळात चित्रपटांचे शूटिंग बंद असल्याने प्रार्थनाने घरी राहून तिची चित्रकलेची कला जोपसली. विविध चित्र काढतानाचे व्हिडीओ आणि फोटो ति सोशल मीडियावर शेअर करत होती. देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती पाहता प्रार्थनाने तिच्या पेंटिग्स विकून गरजू लोकांना मदत करायचे ठरवले आहे. तिच्या अनोख्या उपक्रमात प्रार्थनाने प्रेक्षकांची मदत मागितली आहे.(Marathi actress prarthana behere selling her paintings for helping corona patients)

या उपक्रमाची माहिती प्रार्थनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. या पोस्टला प्रार्थनाने कॅप्शन दिले, 'नमस्कार, करोनाच्या सध्याच्या अवताराने जगात धुमाकूळ घातलाय. हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. कोरोनामुळे अनेकांना शारीरिक व आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला खूप हाल सोसावे लागतायत. अश्यावेळी मी त्यांच्यासाठी काय करू शकते हा विचार नेहमी माझा मनात यायचा. लॉकडाउनच्या काळात मी पेंटिंग करायला सुरवात केली आणि त्याच वेळी मला माझ्या मैत्रिणीकडून ह्या पेंटिंग्स विकून, त्या रकमेतून गरजू लोकांना मदत करण्याची कल्पना सुचली.'

prarthana behere
सूर्यवंशी, बेल बॉटम एकाच दिवशी रिलीज होणार? अक्षय म्हणाला...

पुढे तिने लिहीले, 'स्वतःची कला विकायला कोणालाच आवडत नाही पण मी हे पेंटिंग पैसे कमावण्यासाठी विकत नसून ह्या मधून मिळणारी सर्व रक्कम समाज कार्यासाठी वापरायचे ठरवले आहे. माझ्याकडून एक मदत म्हणून मी हा उपक्रम राबवत आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्वांची मदत हवी आहे. हे पेंटिंग विकायला आहेत म्हणून घेऊ नका, तर ते पैसे तुम्ही समाज कार्यासाठी दान करत आहात अशी भावना ठेवा आणि त्या बद्दल माझ्याकडून हे पेंटिंग रिटर्न गिफ्ट आहेत असे समजा. जे लोकं पेंटिंग विकत घेतील त्या सर्वांना लॉकडाउन संपल्यावर कुरिअरनी ते घरपोच पाठवले जातील व मी स्वतः त्यांना संपर्क करेन. ह्या उपक्रमा मधून मिळणारा आनंद, समाधान आणि तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर ह्या उपक्रमात सामील व्हावे हीच प्रार्थाना’. प्रार्थनाच्या या उक्रमांचे अनेकांनी कौतुक केले आहे.

prarthana behere
तेजस्विनीचं वाढदिवसानिमित्त चाहत्यांना गिफ्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com