प्रिया बापटचे हिंदी वेबसिरीजमध्ये पदार्पण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

प्रिया बापट लवकरच नागेश कुकुनूर दिग्दर्शित एका हिंदी वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट ही लवकरच डिजिटल क्षेत्रात पदार्पण करणार आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या आणि प्रियाच्या अवतीभवती फिरणाऱ्या वेबसिरीजमध्ये तिच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू उलगडणार आहेत.

मराठी इंडस्ट्रीत प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने 'चारचाँद' लावले. 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनयकौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे  प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.

हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा गाजवणार यात शंका नाही. ॲप्लॉज एंटरटेनमेंटची निर्मिती आणि नागेश कुकुनूर यांचे दिग्दर्शन असणाऱ्या  'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीजमध्ये प्रिया दिसणार आहे. नागेश यांनी यापूर्वी बॉलिवूडला 'डोर', 'इक्बाल', 'धनक' यांसारख्या उत्तम कलाकृती दिल्या आहेत. लवकरच हॉटस्टारवर ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे.

priya_bapat_1

priya_bapat_2

Web Title: marathi actress priya bapat entering in hindi web series