सई ताम्हणकरने केला गृहप्रवेश...

रविवार, 13 मे 2018

'आठवणीतला दिवस, पुणे, 12.5.2018' असे कॅप्शन देत सईने आपल्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.

आपले स्वतःचे हक्काचे आणि स्वतःच्या हिमतीवर उभारलेले घर असावे असं स्वप्नं अनेकजण बघतात. ते पुर्ण व्हावे म्हणून दिवसरात्र मेहनत करतात. अशा मेहनतीचे फळ नुकताच अभिनेत्री सई ताम्हणकरने कमावले आहे. तिने स्वतःचे घर खरेदी केले आहे आणि तेही पुण्यात. 

सई मुळची पुण्याची. तिने इंस्टाग्रामवर आपल्या नव्या घराचे फोटो अपलोड केले आहेत. सोबतच तिच्या आईसोबत या नव्या घरातील तिचे फोटो सध्या व्हयरल होत आहेत. गृहप्रवेशासाठी ती पारंपरिक वेशात दिसत आहे. स्वतःच्या घराचा आनंद आणि समाधान सईच्या हास्यावरुन झळकुन येत आहे. 'आठवणीतला दिवस, पुणे, 12.5.2018' असे कॅप्शन देत सईने आपल्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.
 

आमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सामाजिक कामातही सईने सहभाग घेतला होता. सई गेल्या 3 वर्षांपासून पानी फाऊंडेशनशी जोडली गेली आहे. सईने पुण्याजवळच्या सुकलवाडी इथे श्रमदान केलं होतं. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress saie tamhankars new home