प्रत्येक भूमिका स्वप्नवतच! : तेजश्री प्रधान (रॅपिड फायर)

तन्मयी मेहेंदळे
शुक्रवार, 9 जून 2017

तुझा आवडीचा रंग कोणता? 
- पीच रंग मला खूप आवडतो. 

रिकाम्या वेळात काय करतेस? 
- फिरायला जाते. मला वाचन करायला आवडते. 

पहिला फोन? 
- मी अकरावीत असताना माझा पहिला फोन येणार म्हणून खूप उत्सुक होते, तेव्हा माझ्याकडं "नोकिया'चा फोन होता. 

तुझा आवडीचा रंग कोणता? 
- पीच रंग मला खूप आवडतो. 

रिकाम्या वेळात काय करतेस? 
- फिरायला जाते. मला वाचन करायला आवडते. 

पहिला फोन? 
- मी अकरावीत असताना माझा पहिला फोन येणार म्हणून खूप उत्सुक होते, तेव्हा माझ्याकडं "नोकिया'चा फोन होता. 

लहानपणीची कोणती गोष्ट मिस करतेस? 
- मी सगळं लहानपण मिस करते, जे आता परत जगता येणार नाही. 

तू अभिनेत्री नसतीस. तर काय व्हायला आवडलं असतं? 
- मला समुपदेशक व्हायला आवडलं असतं. 

तुझं महाविद्यालय कोणतं? 
- मुंबईचं वझे केळकर महाविद्यालय. 

आयुष्यातील टर्निंग पॉइंट? 
- मला मिळालेली प्रत्येक भूमिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरली आहे. 

तुझी सर्वांत जवळची मैत्रीण? 
- अभिनेत्री सुरुची आडारकर माझी जिवलग मैत्रीण आहे. 

नाटक, सिनेमा, मालिका यांपैकी कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं? 
- मला तीनही माध्यमं आवडतात, कारण काम हे काम असतं. कोणतंही काम आनंदानं केलं, की त्यातून समाधान मिळतंच. 

आजच्या तरुणाईला काय संदेश देशील ? 
- कायम जमिनीवर राहा आणि महत्त्वाचं म्हणजे मनाला वाटेल ते करा. मात्र, समाजाला, घरच्यांना त्याचा त्रास होणार नाही, हे पाहा. 

तुझा ड्रीम रोल? 
- समोर येईल तेच काम "स्वप्न' आहे, एवढ्या तन्मयतेनं करायला हवं. आजपर्यंतच्या सर्वच भूमिका कलाकार म्हणून करत आले आहे. प्रामाणिक प्रयत्न यश देतात. 
 

Web Title: marathi actress tejashree pradhan interview