Photos : या अभिनेत्रीला ओळखलंत का? तिला पाहून नेटकरीही गोंधळले

टीम ईसकाळ
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

तिने नुकतंच फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये तिने मेकओव्हर केलाय आणि एका फोटोत तर ती बिलकूल ओळखू येत नाही. कोण आहे ही अभिनेत्री?

मराठी चित्रपटसृष्टीतली सुंदर, नृत्यांत पारंगत असलेली व महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री... तिने नुकतंच फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये तिने मेकओव्हर केलाय आणि एका फोटोत तर ती बिलकूल ओळखू येत नाही. कोण आहे ही अभिनेत्री?

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि महेश कोठारेंची सून उर्मिला कानिटकर-कोठारे हिने मेकओव्हर करून स्वतःचा लूकच चेंज केलाय. तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील एका फोटोत ती इतकी वेगळी दिसतीय की, नेटकरीही तिला ओळखू शकले नाहीत. या फोटोला 'स्त्रीकडे असलेली सर्वात आकर्षक संपत्ती म्हणजे तिचा आत्मविश्वास!' या फोटोला इतर अभिनेत्रींचीही पसंती मिळाली आहे. तर उर्मिलाच्या चाहत्यांच्या लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडलाय.

 

उर्मिला मागील काही दिवस चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. मुलगी जिजामुळे तिचा वेळ कसा जातो हे तिलाच कळत नाही. असे असले, तरी ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Wishing you all a very Happy Children's Day

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

जिजासोबतचे अनेक फोटो, व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. पण सध्या तिने शेअर केलेल्या फोटोशूटची चर्चा सगळीकडे होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Actress Urmila Kanitkar shares her unique photos on Instagram