coronavirus: पडद्यामागच्या कामगारांना मराठी कलाकारांचा मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

`मराठी कलाकार फॉर महाराष्ट्र` हा एक ग्रुप मराठी कलाकारांनी तयार केला आहे. आणि या ग्रुपमार्फत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी पडद्यामागच्या कामगारांना आर्थिक मदत तसेच जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबई- कोरोनाचा सर्वाधिक फटका तळ हातावर पोट असणाऱ्या कामगारांना बसला आहे. कोरोनाबरोबर समोर आर्थिक संकट उभं ठाकलेलं असताना प्रत्येक दिवस कसा काढायचा? हा प्रश्न अनेक कामगारांच्या डोळ्यांसमोर उभा आहे. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या विविध कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामध्ये मेकअपमन, हेअरड्रेसर, स्पॉटबॉय आदी कामगारांचा समावेश आहे. आता त्याच कामगारांना मदत करण्यासाठी मराठी कलाकार पुढे सरसावले आहेत. `मराठी कलाकार फॉर महाराष्ट्र` हा एक ग्रुप मराठी कलाकारांनी तयार केला आहे. आणि या ग्रुपमार्फत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी पडद्यामागच्या कामगारांना आर्थिक मदत तसेच जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. 

हे ही वाचा- लॉकडाऊनमध्ये अशी कमी करा दारुची तलफ

सध्या चित्रीकरण बंद असल्यामुळे मराठी मालिका, नाटक, चित्रपटांसाठी जे कामगार पडद्यामागे काम करतात त्यांची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. म्हणूनच त्यांना आधर म्हणून शक्य तेवढी मदत केली जात आहे.

Image

अभिनेता सुबोध म्हणतो,  `मराठी कलाकार फॉर महाराष्ट्र` तर्फे आम्ही पडद्यामागे काम करणाऱ्या कामगारांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. लालबाग, परळ, शिवडी येथे राहणाऱ्या पडद्यामागील कामगारांना आज त्यांच्या घरी जाऊन जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक स्वरुपात मदत करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू यामध्ये मीठ, तांदुळ, डाळ, तेल यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच 1 एप्रिलला देखील आमचे दोन टॅम्पो मुंबईतील वेगवेगळ्या भागात जिथे आपले कामगार राहतात तिथे जाऊन ही मदत पोच करणार आहे. पुणे, कोल्हापुरमध्ये राहणाऱ्या पडद्यामागील कामगारांनाही मदत केली जाणार आहे. तसेच मराठी कलाकार यासाठी आपापल्या परिने मदत करत आहे.'  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

नमस्कार, कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आलंय. प्रत्येकजण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतोय. लवकरच बाहेर पडूच. पण आपली मराठी कलाकार म्हणून वाटचाल सुरु असताना ह्या प्रवासात ज्यांनी पाणी आणून दिलं, जेवण वाढलं, चेहऱ्याला लागलेला रंग जपायला मदत केली, कपडे इस्त्री केले, सेटवर खिळे ठोकले, नाटकाची प्रॉपर्टी सांभाळली...थोडक्यात ज्यांचं त्यादिवशीच्या पैशांवर/पाकिटावर पोट भरत होतं, अशांना आपण मदतीचा हात द्यायचं ठरवलं आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या कलाकारांनी ह्या आपत्तीतही गरजवंताला हात द्यायचं ठरवलंय. तेव्हा जशी यथाशक्ती मदत केलीत (काहींना व्यस्त असल्याने इच्छा असूनही करता आली नाही. आता करता येईल.) अशा सगळ्या मराठी कलाकारांना पुन्हा एक आवाहन करतो आहोत. बँकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेक अप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ इत्यादी.... अशांना आपण काही दिवस पुरेल इतका शिधा आणि औषधं वगैरे इतर खर्चासाठी रोख रुपये १००० अशी मदत करण्याचे ठरवले आहे. आपण शक्य होईल तितका आपला सहभाग द्या. (नाही दिलात तरी नाराजी नाही बरं का.) 

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

`मराठी कलाकार फॉर महाराष्ट्र` या मराठी कलाकारांच्या ग्रुपने यापूर्वी कोल्हापूर, सांगली येथील पुरग्रस्तांनाही मदत केली होती. बॉलिवूड कलाकारांबरोबरच मराठी कलाकारही कोरोनासारख्या भीषण संकटात आर्थिक मदतीसाठी धावून आले आहेत.

Image

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (छोटी), अभिनेता सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत केली आहे. याबाबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांगते, मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये माझा हातभार म्हणून काही रक्कम जमा केली आहे. किती आर्थिक मदत केली हे मी सांगू इच्छित नाही. कारण त्यावर चर्चा मला नको आहे. मला शक्य होईल तेवढी मी मदत केली आहे. 

अभिनेत्री दिपाली सय्यदने देखील गरजू आणि गरिबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे. पुणे, नगर भागातील गरजू, गरिब लोकांना आम्ही जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे. आता कोल्हापुर, सांगली येथे वाटप करणार आहोत. असे अभिनेत्री दिपाली सय्यदने सांगितले आहे.

marathi celebrities helps back stage artists amids coronavirus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi celebrities helps back stage artists amids coronavirus