
Marathi Movie: 'अशोक मामांनंतर तूच..', मराठीतील 'या' अभिनेत्याला मिळाली कामाची अशी पोचपावती
Marathi Movie: मराठीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या विनोदी शैलीला तोड नाही. मराठीत अनेक कलाकार होऊन गेले पण अशोक मामांसारखं विनोदाचं अचूक टायमिंग अभावानाचं कोणाला जमलं असेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पडद्यावर प्रेक्षकांना आपल्या अभिनयाच्या माध्यमातून खळखळवून हसवणारा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यात मात्र बोलतो फारच कमी..अशा अशोक सराफ यांनी केवळ विनोदी नाही तर गंभीर चित्रपटातून साकारलेला खलनायकही तितकाच खुनशी वाटला.
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या अशोक सराफांसोबत एका चाहत्यानं तुलना केली आहे ती आजच्या घडीच्या एका अभिनेत्याची. चला जाणून घेऊया कोण आहे तो लकी अभिनेता?(Marathi comedy actor fan compare him with marathi superstar ashok saraf)
मराठीत आजच्या घडीला अनेक विनोदवीर आहेत जे वेगवेगळ्या टी.व्ही शोजच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करताना दिसतात. प्रत्येकाचं आपलं असं एक वैशिष्ट्य. त्यात सोशल मीडियामुळे हे सगळे कलाकार लोकांच्या अधिक जवळ आलेयत. लोकांना यांना जवळून जाणून घेता येतं. अन् मग यांच्यात आपला एखादा आवडता जुना कलाकार ते शोधू लागतात. कुशल बद्रिकेच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे.
कुशल बद्रिके सध्या परदेशात आपल्या एका सिनेमाच्या शूटिंग निमित्तानं गेला होता. तेव्हा तिथला एक व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला. खरंतर परदेशातील रस्त्यावर एका गाण्याच्या तालावर कुशल आपल्याच धुंदीत निघाला आहे. त्यानं हा व्हिडीओ पोस्ट करत त्याला कॅप्शन दिलं आहे की,'असलं एखादं गाणं आपल्यावर shoot व्हायला हवं यार. तो पर्यंत दुसऱ्यांच्या गाण्यांवर enjoy करत राहू'.
कुशलचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स दिल्या आहे. त्यातील एका चाहत्याच्या कमेंटनं लक्ष वेधून घेतलं आहे. खरंतर कुशलसाठी ती दाद खूपच मोठी म्हणावी लागेल. अन् तसं बोलून त्या चाहत्यानं त्याच्यातील कलाकाराचा सम्मान केला आहे खऱ्याअर्थानं.
तो चाहता व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला आहे, 'अशोक मामांनंतर तूच रे दादा..'..आता असं बोलून चाहत्यानं कुशल बद्रिकेची तुलना मराठीतील अभिनय सम्राट अशोक सराफ यांच्यासोबत केली आहे. अर्थात या अशा कमेंट्सच कलाकारांना उर्जा देत असतात आपला अभिनय अधिक संपन्न करण्यासाठी.