एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ- केदार शिंदे

'त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे. एकदम 70mm..'
kedar shinde raj thackeray
kedar shinde raj thackerayfacebook

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे Raj Thackeray आपला ५३वा वाढदिवस साजता करत आहेत. कार्यकर्त्यांकडून आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच मराठी दिग्दर्शक केदार शिंदे Kedar Shinde यांनी लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत केदार शिंदेंनी ही खास पोस्ट लिहिली आहे. 'एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ', असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. (marathi director kedar shinde post for mns leader raj thackeray)

केदार शिंदेंची पोस्ट-

'राजसाहेब, ते राजकीय नेते म्हणून कसे आहेत? याविषयी लिहायला त्यातला मी माहीर नाही. पण एक कलावंत आणि मित्र म्हणून एका वाक्यात लिहू शकतो. तो राजा माणूस आहे. तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणं फार अवघड आहे. संगीत चित्रपट या दोन क्षेत्रातला त्यांच्या तोडीचा माहितगार दुसरा कोणी मी पाहिला नाही. मैत्री करावी तर या राजा माणसाशी. सतत लक्ष असतं त्यांचं. सतत संपर्कात असतात. वाढदिवस साजरा करून वय वाढत, पण राजसाहेब यंग अँड डायनॅमिक आहेत. या कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्ये हा एकमेव राजकीय नेता होता, ज्याने कितीही विरोधात असला तरी त्याची राजकीय पोळी भाजली नाही. हे आपल्याला सतत जाणवलंय, मान्य करायालाच हवं.'

'एकच वाटतं की, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात अजून तशी संधी मिळाली नाही. त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे. एकदम 70mm.. आपण इतक्या लोकांना संधी दिली. काहींना न देता गोळाबेरीज करून त्यांनी आपली आपणच मिळवली. एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ. नक्कीच आपल्यावर 'राज्य' येणार नाही, याची ते काळजी घेतील. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे गिफ्ट येत्या निवडणुकीत मनसे मतदान करून देऊ. मला खात्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांना मनोमन मानणारे राजसाहेब आपल्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील.'

kedar shinde raj thackeray
'मराठी मुलगा भेटला नाही का?' सोनालीनं दिलं भन्नाट उत्तर

सध्या कोरोनाच्या काळात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com