'आर्ची' दहावी पास; तिला बनायचंय डॉक्टर

टीम ई सकाळ
मंगळवार, 13 जून 2017

शालेय जीवनातच तिला मोठा ब्रेक मिळाल्याने तिच्याकडे अनेक भूमिकांसाठी आणि कार्यक्रमांसाठी रांगा लागल्या. त्यामुळे तिला शाळेत नियमित हजर राहून अभ्यास करणे अशक्य झाले होते.

अकलुज / मुंबई : ‘सैराट’मुळे चित्रपटरसिकांमध्ये लोकप्रिय झालेली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती युवा अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने दहावीच्या परीक्षेत 66.40 टक्के गुण मिळवले आहेत. आपल्याला डॉक्टर बनायची इच्छा असल्याचे तिने यापूर्वीच सांगितले आहे.

रिंकू हिला मागील वर्षी नववीत ८१.६० टक्के गुण मिळाले होते. मात्र, नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून रिंकूच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. शालेय जीवनातच तिला मोठा ब्रेक मिळाल्याने तिच्याकडे अनेक भूमिकांसाठी आणि कार्यक्रमांसाठी रांगा लागल्या. त्यामुळे तिला शाळेत नियमित हजर राहून अभ्यास करणे अशक्य झाले होते. मात्र, त्यातूनही तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही हे तिच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. 

दुपारी 1 वाजता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच रिंकूच्या निकालाचे छायाचित्र व्हायरल झाला आहे. 

रिंकू ‘मनसू मल्लिगे’ या कन्नड चित्रपटासाठी चित्रीकरण करत होती. त्यामुळे काम आणि अभ्यास यांच्यामध्ये कसरत करत होती. ‘सैराट’मधील आर्चीच्या माध्यमातून रिंकू राजगुरुने आपल्या अभिनयाने प्रस्थापित अभिनेत्रींनाही धक्का दिला. मात्र, ही हवा डोक्यात जाऊ न देता तिने शाळेतही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रिंकूच्या कुटुंबीयांशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
'होय, मी फक्‍त शेतकरीच आहे'...!
#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना​
धुळे: लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम प्रगतीपथावर​
डोंगरावर फुलविले आमराईचे नंदनवन​
आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या​
श्रीलंकेच्या चुकांमुळे पाक उपांत्य फेरीत​
गुजरातमध्ये स्मृती इराणींच्या दिशेने फेकल्या बांगड्या
जोगेश्वरीमध्ये शौचालयात आढळला पुरुषाचा मृतदेह

Web Title: marathi entertainment news archi actress rinku rajguru ssc rusult