'ऋण' कादंबरीवर येतोय 'जजमेंट'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' कादंबरीवर आधारित आहे.

तेजश्री प्रधान, मंगेश देसाई आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'जजमेंट' या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली.

ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित 'जजमेंट' या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर सुर्वे यांनी केले आहे. हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शक सुर्वे यांनी यापूर्वी व. पु. काळे यांच्या 'पार्टनर' या कादंबरीवर आधारित 'श्री पार्टनर' आणि 'शुभ लग्न सावधान' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी या चित्रपटाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. 'जजमेंट'च्या गाण्याचे गीतकार मंदार चोळकर असून संगीतकार नवल शास्त्री आहेत. या चित्रपटात 'श्री पार्टनर' फेम श्वेता पगार हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. सोबतच सतीश सलागरे, किशोरी अंबिये, महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा देशमुख आणि नुमायारा खान आदी कलाकार सुद्धा आहेत.

judgement

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi film Judgement was recently announced